काँग्रेसच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये भाजपा आमदार देवयानी फरांदे यांची पोस्ट!
By संजय पाठक | Published: July 18, 2024 11:17 AM2024-07-18T11:17:18+5:302024-07-18T11:17:50+5:30
विरोध करणाऱ्या पक्ष प्रवक्त्यालाच केले रिमूव्ह
नाशिक-काँग्रेस पक्षाच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या कार्यक्रमाची पोस्ट टाकल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते दर्शन पाटील यांनी त्यास आक्षेप घेतला त्यामुळे त्यांना या ग्रुप मधूनच रिमूव करण्यात आले आहे या संदर्भात त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे तक्रार केली आहे.
अर्थात काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ऍड आकाश छाजेड यांचे माजी।आमदार स्व. जयप्रकाश छाजेड यांच्या वडिलांच्या नावाने साकारण्यात आलेल्या उद्यानाचे लोकार्पण आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते होणार असल्याची ती पोस्ट होती त्यामुळे त्यात चुकीचे काहीच नव्हते असे स्पष्टीकरण ऍड. आकाश छाजेड यांनी दिले आहे.
काँग्रेस पक्षाच्या संघटनेचा एक व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आले असून त्यात स्व. जयप्रकाश छाजेड उद्यानाचे लोकार्पण दिपाली नगर येथे होणार असल्याचे असल्याची पोस्ट शहराध्यक्ष ऍड. छाजेड यांचे बंधू प्रीतिश छाजेड यांनी टाकली होती मात्र हा काँग्रेसचा ग्रुप आहे की, भाजपाचा हे ठरवून घ्या अशी टिप्पणी दर्शन पाटील यांनी केली.त्यानंतर ऍड. छाजेड यांनी त्यांना समजावण्यासाठी फोन केला होता मात्र त्यांनी फोन उचलला नसल्याने त्यांना थेट पक्षाच्या वॉट्स ग्रुप मधून रिमूव करण्यात आले. दर्शन पाटील हे केवळ सोशल मीडियावरच काम करतात पक्षाच्या बैठकीला देखील उपस्थित नसतात काँग्रेस नेते, माजी आमदार स्वर्गीय जयप्रकाश छाजेड यांच्या नावाने साकारण्यात आलेल्या उद्यानाच्या लोकार्पणाची ती पोस्ट होती त्यामुळे त्यात वावगे नव्हते असे स्पष्टीकरण आकाश छाजेड यांनी दिले आहे. मात्र, आपण कोणत्या प्रकारे चुकीचा आक्षेप घेतलेला नव्हता. लोकसभा निवडणुकीच्या काळात उमेदवाराच्या प्रचारासाठी अनेक चौकसभा देखील घेतल्या आहेत अशा प्रकारच्या त्रास देण्यामुळे आपले नीती धैर्य खचणार नाही या संदर्भात आपण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे तक्रार केली आहे असे प्रवक्ता दर्शन पाटील यांनी सांगितले.