शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

भाजपा आमदार खतप्रकल्पावर; महापौर गंगापूर धरणावर...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2016 11:22 PM

एकमेकांवर कुरघोडी : नागरी समस्यांचे ‘राजकीय’ भांडवल; आगामी संघर्षाची नांदी

नाशिक : गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी पाणी पळविले जात असताना भाजपा आमदारांनी चुप्पी साधल्यानेच नाशिककरांना सद्यस्थितीत पाणीकपातीला सामोरे जावे लागत असल्याचा प्रचार महापालिकेतील सत्ताधारी मनसेसह भाजपाविरोधी पक्षांनी चालविला असताना गुरुवारी दुपारी भाजपा आमदारांनी पदाधिकाऱ्यांसह खतप्रकल्प गाठत त्याच्या दुरवस्थेबद्दल मनसेवर हल्ला चढविला. तर दुसरीकडे महापौरांनी पदाधिकाऱ्यांसह थेट गंगापूर धरणाकडे कूच करत पाणी परिस्थितीचा अंदाज घेत आणखी पाणीकपातीचे संकेत दिले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभयतांमध्ये आगामी काळात नागरी समस्यांचे ‘राजकीय’ भांडवल करत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा ‘शो’ नाशिककरांना बघायला मिळणार आहे. भाजपाचा विरोध डावलून आयुक्तांनी गेल्या सोमवार (दि. २२) पासून शहरात विभागवार जलशुद्धिकरणनिहाय आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यातच भाजपाविरोधी नगरसेवकांनी आता सोशल मीडियावरून नागरिकांना पाणीबचतीचे आवाहन करतानाच भाजपामुळेच नाशिककरांचे हक्काचे पाणी पळविण्यात आल्याची जाणीव करून देण्यास सुरुवात केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपाला ‘पाणी’ हा प्रश्न मोठ्या प्रमाणावर छळणार असून त्याचा फटकाही बसण्याची शक्यता राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाऊ लागली आहे. त्यामुळे बावरलेल्या भाजपा आमदार व पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी मनपाच्या खतप्रकल्पाकडे धाव घेत तेथील परिस्थितीची पाहणी केली. खतप्रकल्पाच्या दुरवस्थेला सत्ताधारी मनसेच जबाबदार असल्याचा आरोप भाजपा आमदारांनी केला. खतप्रकल्पाच्या समस्येबाबत आयुक्तांची भेट घेऊन त्याबाबत रान उठविण्याचेही संकेत भाजपाने दिले. भाजपाकडून मनसेविरोधी रणनीती आखली जात असतानाच सायंकाळी महापौर अशोक मुर्तडक यांनी पदाधिकाऱ्यांना सोबत घेत थेट गंगापूर धरण गाठले.