नाशिक : पालघर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने केलेल्या खेळीला चोख प्रत्युत्तर देत भाजपाने नाशिकमध्ये विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यासंदर्भात भाजपाच्या अनधिकृत सूत्रांनी दुजोरा दिला आहे. तथापि, अधिकृतरीत्या माहिती देण्याऐवजी सस्पेंस कायम ठेवण्यावर भर दिला जात आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत अधिकृत भूमिका रात्री उशिरा किंवा सकाळी जाहीर करू असे सांगितले आहे. भाजपाने असा निर्णय घेतल्यास सेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांना भाजपाने बळ दिल्यास शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना मतांसाठी कसरत करावी लागणार, परंतु भाजपाच्या भरवशावर उमेदवारी करणाऱ्या परवेज कोकणी यांचीदेखील अशीच अवस्था होणार आहे.
विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुका होत असताना शिवसेनेने जेथे संख्याबळ अधिक आणि विजय समीप अशा तीन ठिकाणी निवडणूक लढविण्याचे जाहीर केले. त्यामुळे उर्वरित ठिकाणी भाजपाला संधी दिल्याची चर्चा होती. मात्र, पालघरमध्ये भाजपाला नामोहरम करण्यासाठी श्रीनिवास वणगा यांना सेनेने गळाला लावल्याने त्याची परतफेड करण्यासाठी थांबलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगोदर जाहीर केल्याप्रमाणे योग्य वेळी योग्य निर्णय घोषित करीत शिवसेनेला गॅसवर ठेवले आहे. सोमवारी (दि. २१) होणा-या मतदानाला अवघे काही तास बाकी असताना रविवारी (दि. २०) रात्री महामार्गावरील हॉटेल ज्युपिटरमध्ये भाजपाच्या नगरसेवक तसेच सदस्यांची बैठक पालकमंत्री गिरीश महाजन आणि संघटनमंत्री किशोर काळकर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. तथापि, रात्री उशिरापर्यंत पालकमंत्री गिरीश महाजन हे न आल्याने अधिकृत घोषणा केली जात नव्हती. भाजपाच्या स्थानिक सूत्रांनी मात्र राष्ट्रवादीला पाठींबा देण्याबाबत कळविण्यात आल्याचे अनधिकृतरीत्या सांगितले. भाजपाने या निवडणुकीत राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यास त्यांचे संख्याबळ वाढू शकते. एकूण ६४३ मतदारांपैकी राष्ट्रवादीचे १००, तर कॉँग्रेसचे ७१ सदस्य असून त्यांना भाजपाच्या १६७ सदस्यांची साथ मिळाल्यास संख्याबळ अधिक होऊ शकते.
विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वप्रथम अॅड. शिवाजी सहाणे यांना उमेदवारी घोषित केली. त्यानंतर शिवसेनेने नरेंद्र दराडे यांचे नाव घोषित करून औपचारिकता दूर केली. भाजपाने निवडणूक लढण्याचे जाहीर केले नसले तरी या पक्षाचे परवेज कोकणी यांनी विकास आघाडीच्या नावाखाली उमेदवारी घोषित केल्याने ते भाजपाचे पुरस्कृत उमेदवार तरी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, भाजपाने याबाबत सस्पेंस कायम ठेवला होता. मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरापर्यंत भाजपाच्या सदस्यांची मुंबईत बैठक घेतली आणि नंतर योग्य वेळी निर्णय घेऊ, असे जाहीर केले होते.भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिल्याची चर्चा असली विधान परिषद निवडणुकीत सर्वच पक्षात मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंगची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वच उमेदवारांनी अन्य पक्षांतील नाराज आपल्या गळाला लावले असून, त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याचे सांगितले जात आहे.सस्पेंस कायम ठेवण्याचा प्रयत्नभाजपाच्या भूमिकेविषयी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण मतदार संघातील मतदारांचा डाटा मागवला असून रात्री त्यावर पक्षाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले. राष्ट्रवादीला पाठींबा देण्याबाबत काहीच भूमिका ठरली नसल्याचे सांगून कदाचित सोमवारी (दि. २१) सकाळी देखील भूमिका जाहिर होऊ शकते असे सांगून संस्पेस कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. सस्पेन्स कायम ठेवण्याचा प्रयत्न भाजपाच्या भूमिकेविषयी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण मतदारसंघातील मतदारांचा डाटा मागवला असून, रात्री त्यावर पक्षाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगितले. राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याबाबत काहीच भूमिका ठरली नसल्याचे सांगून कदाचित सोमवारी (दि. २१) सकाळीदेखील भूमिका जाहीर होऊ शकते, असे सांगून सस्पेन्स कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिल्याची चर्चा असली तरी निवडणुकीत सर्वच पक्षांत मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंगची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वच उमेदवारांनी अन्य पक्षांतील नाराज आपल्या गळाला लावले असून, त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याचे सांगितले जात आहे.