पाळे खुर्द : केंद्र सरकारच्या शेतकरी हिताचे कृषिविषयक विधेयकाला महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिल्याने कळवण तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात येऊन स्थगिती आदेश आघाडी सरकारने रद्द करावा. अशा मागणीचे निवेदन कळवण तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदार बी. ए. कापसे यांना देण्यात आले.मोदी सरकारने संसदेत दोन्ही सभागृहात ऐतिहासिक कृषीविषयक विधेयक मंजूर करु न शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र क्र ांती घडवणारे पाऊल उचलले आहे. मात्र शेतकऱ्यांबद्दल काँग्रेस आणि विरोधक अकारण कांगावा व अप्रचार करु न राजकारण करीत आहेत. या नवीन कायद्यामुळे देशातील शेतकरी बंधमुक्त आणि दलालांच्या जोखडातून मुक्त होऊन त्याला आपल्या कष्टाने पिकवलेल्या शेतीमालाला विक्र ी व बाजारपेठेचे स्वातंत्र्य मिळणार आहे. शेतक-यांसाठी एक देश, एक बाजारपेठ असणार आहे. आपला शेतीमाल कुठेही आणि योग्य भावात विकण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. पंतप्रधान मोदींनी एसएमपी (किमान आधारभूत किंमत) कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. या कृषी सुधारणा विधेयकामुळे शेतकºयांना खºया अर्थाने स्वातंत्र्य प्राप्त होणार आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मोदी सरकारने शेतकºयांच्या हिताचा व दिलेले स्वातंत्र्य हिरावणारा स्थगिती आदेश काढला आहे. असे निवेदनात म्डटले आहे. त्याचा भारतीय जनता पार्टी कळवण तालुका निषेध करीत असुन हा स्थगिती आदेश रद्द करण्याची मागणी तालुकाध्यक्ष दिपक खैरनार, संघटन सरचिटणीस डॉ. अनिल महाजन, विश्वास पाटील, काशिनाथ गुंजाळ, सचिन सोनवणे, हेमंत रावले, चेतन निकम, मोतीराम वाघ, हितेंद्र पगार आदींनी निवेदनाद्वारे केली आहे.