राहुल गांधींच्या निषेधार्थ भाजपची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 01:31 AM2019-12-17T01:31:45+5:302019-12-17T01:32:10+5:30

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा भाजपच्या वतीने जाहीर निषेध करीत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ‘राहुल गांधी हाय हाय, राहुल गांधी माफी मांगो’ अशा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला होता.

 BJP protests against Rahul Gandhi protest | राहुल गांधींच्या निषेधार्थ भाजपची निदर्शने

राहुल गांधींच्या निषेधार्थ भाजपची निदर्शने

Next

नाशिक : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा भाजपच्या वतीने जाहीर निषेध करीत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ‘राहुल गांधी हाय हाय, राहुल गांधी माफी मांगो’ अशा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला होता.
सावरकर यांच्याविषयी काढलेले अपमानास्पद विधान करून त्यांचा आणि तमाम देशभक्त बांधवांचा अपमान केल्याने त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात सावरकर यांच्यासारख्या महान स्वातंत्र्यसेनानीबाबत अवमानजनक वक्तव्य केल्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करीत पुतळा हिसकावून घेतला. त्यामुळे आंदोलक आणि पोलीस यांच्यात झटापट देखील झाली. आंदोलनप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, विजय साने, प्रा. सुहास फरांदे, लक्ष्मण सावजी, उत्तम उगले, देवदत्त जोशी, उद्धव निमसे, हिमगौरी आडके, रोहिणी नायडू, सुजाता करजगीकर, भारती बागुल, पुष्पा शर्मा, प्रशांत आव्हाड, प्रथमेश गिते, आशिष नहार, पवन भगूरकर, अरुण शेंदुर्णीकर, अजिंक्य साने, बाळासाहेब पाटील, अ‍ॅड. भानुदास शौचे, प्रफुल्ल संचेती, सुहास शुक्ल, योगेश हिरे, गोविंद बोरसे, समीर देव आदींसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्टÑभक्ती तुझे नाव सावरकर !
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांचा निषेध म्हणून काळ्या फिती बांधल्या होत्या. तसेच सावरकर यांचे छायाचित्र असलेले फलक झळकवत घोषणा दिल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘राष्टÑभक्ती तुझे नाव सावरकर-सावरकर, देशभक्ती तुझे नाव सावरकर-सावरकर’ अशा घोषणादेखील देत परिसर दणाणून सोडला होता.

Web Title:  BJP protests against Rahul Gandhi protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.