शिष्टमंडळात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस भूषण कासलीवाल, चांदवड तालुका भाजपा अध्यक्ष मनोज शिंदे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शांताराम भवर, शहराध्यक्ष प्रशांत ठाकरे, विशाल ललवाणी, मनोज बांगरे, नितीन फंगाळ, गणेश पारवे आदी उपस्थित होते. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर हिंसाचार सुरू केला असून, दहशत निर्माण केली जात आहे. या राजकीय हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी चांदवड शहरात पोलीस स्टेशन येथे निदर्शने केली. कोरोनाचे नियम पाळून हे आंदोलन करण्यात आले. सध्या कोरोना लॉकडाऊन असल्यामुळे हे आंदोलन सामुदायिकरीत्या न करता प्रत्येकाने वैयिक्तक स्वरूपात केल्याचे निवेदनात म्हटले आहे.
फोटो - ०५ चांदवड बीजेपी
चांदवड तालुका भाजपाच्या वतीने पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना निवेदन देताना भूषण कासलीवाल, मनोज शिंदे, प्रशांत ठाकरे, विशाल ललवाणी, मनोज बांगरे, गणोश पारवे आदी.
===Photopath===
050521\05nsk_31_05052021_13.jpg
===Caption===
०५ चांदवड बीजेपी