येवला : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत येवला शहर भाजपाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.शहरातील विंचूर चौफुलीवर रविवारी (दि. २१) सकाळी ११ वाजता भाजपाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी लिहिलेले पत्र खळबळजनक नाही तर धक्कादायक आहे. परमबीर सिंग यांनी पत्रात जोडलेले चॅट हा गंभीर पुरावा आहे.महाराष्ट्राच्या पोलीस विभागात धक्कादायक प्रकरण उघडकीस येत आहेत. पोलीस दलाचं खच्चीकरण होताना दिसत आहे. गृहमंत्री आपल्या पदावर राहू शकत नाहीत. गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी यावेळी भाजपा शहराध्यक्ष तरंग गुजराथी यांनी केली.निदर्शन आंदोलनात नगरसेवक प्रमोद सस्कर, युवा जिल्हाउ पाध्यक्ष मयूर मेघराज, संघटन सरचिटणीस बापू गाडेकर, ओबीसी जिल्हा सरचिटणीस राजू परदेशी, सुनील काटवे, विशाल काठवटे, पंकज पहिलवान, बाळू सातळकर, राजू नागपुरे, सुनील बाबर, चंद्रकांत माईनकर, सुरेश सावंत, आयटी सेल प्रमुख प्रणव दीक्षित, राजेश धसे, सोमनाथ गवळी, ललित वखारे, बाबू खानापुरे, संदीप दारुटे, नवनाथ घुले, शाहरुख शेख, अनिफ शेख, हेमंत व्यवहारे आदी सहभागी झाले होते. (२१ येवला बीजेपी)
गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठीयेवल्यात भाजपाची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 6:57 PM
येवला : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत येवला शहर भाजपाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
ठळक मुद्देविंचूर चौफुलीवर रविवारी (दि. २१) सकाळी ११ वाजता भाजपाच्या वतीने निदर्शने