येवला : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचा शहर व तालुका भाजपाने निदर्शने करत निषेध व्यक्त केला.ठाकरे सरकारच्या दबावाने करण्यात आलेली राणेंची अटक ही संविधानिक नसून सूड बुद्धीचे राजकारण आहे. सत्तेचा गैरवापर, पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग असून दडपशाहीने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था यांचा बोजवारा उडाल्याचे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याप्रकरणी निवासी नायब तहसीलदार बाळासाहेब हावळे यांना निवेदन देण्यात आले.त्यानंतर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे, प्रदेश सदस्य बाबा डमाळे यांनी मनोगत व्यक्त केले. या आंदोलनात तालुकाध्यक्ष डॉ. नंदकिशोर शिंदे, संघटन सरचिटणीस नानासाहेब लहरे, दिनेश परदेशी, सुधाकर पाटोळे, संतोष काटे, दत्ता सानप, युवराज पाटोळे, गणेश गायकवाड, चेतन धसे, विशाल शिखरे, संतोष केंद्रे, गणेश खळेकर, बडा शिंदे, संजय जाधव, छगन दिवटे, केदारनाथ वेलंजकर, संतोष मुथा, मच्छिंद्र हाडोळे, राजू शिंदे, अमर पांगुळ, सागर नाईकवाडे, स्वप्नील वखारे, दीपक टकले, दत्ता पानसरे, नारायण शिरसाठ, हरिभाऊ पुणे, विशाल भांडगे, जालिंदर पवार, विशाल धुमाळ, योगेश हिवाळे, लहानू शिंदे, संदीप चव्हाण आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.येवला शहर भाजपाच्या वतीनेही शहर पोलीस ठाण्यात निषेधाचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर शहराध्यक्ष तरंग गुजराथी, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नगरसेवक प्रमोद सस्कर, मनोज दिवटे, राजू परदेशी, बापूसाहेब गाडेकर, मयूर मेघराज, राधेश्याम परदेशी, पुरुषोत्तम रहाणे, सुनील बाबर, कुणाल भावसार, ललित वखारे, प्रणव दीक्षित, विशाल कथवटे, पंकज पहिलवान, राजू नागपुरे आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.(२५ येवला २)
राणेंना अटक प्रकरणी येवल्यात भाजपची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 10:43 PM
येवला : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचा शहर व तालुका भाजपाने निदर्शने करत निषेध व्यक्त केला.
ठळक मुद्देनिवासी नायब तहसीलदार बाळासाहेब हावळे यांना निवेदन