नाशिक : देशाचा चौकीदार होण्यासाठी अभिमानाने तयार असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर हॅँडलवर ‘चौकीदार नरेंद्र मोदी’ असे लिहिले आणि त्यापाठोपाठ भाजपात असे विशेषण स्वत:च्या नावापुढे लावण्याची मोहीमच सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह अन्य अनेक नेत्यांनी त्याचे अनुकरण केले. इतकेच नव्हे तर पालकमंत्री गिरीश महाजन आणि भाजपा जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांनीदेखील आपल्या नावापुढे चौकीदार नाव लावले; परंतु नाशिकमध्ये प्रमुख लोकप्रतिनिधी आणि अनेक नेत्यांचा यात अपवाद असल्याचे दिसून आले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण देशाचे चौकीदार असल्याचे वेळोवेळी सांगितले आहे. त्यामुळे सध्या विरोधकांनी राफेल आणि बॅँकबुडव्या उद्योगपतींवरून त्यांच्या चौकीदार शब्दाची खिल्ली उडविणे सुरू केले. त्यामुळे मोदी यांनीही ‘चौकीदार’ हा शब्द प्रतिष्ठेचा करीत आपल्या ट्विटर हॅँडलवर ‘चौकीदार नरेंद्र मोदी’ असे नमूद केले आणि भाजपात चौकीदार हे विशेषण लावून त्यापुढे आपले नाव लावण्याची मोहीमच सुरू झाली. त्याचे अनुकरण होत असताना अनेक आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मात्र चौकीदार उल्लेख करणे टाळले आहे. धुळे, मालेगाव, सटाणा भागाचे नेतृत्व करणाऱ्या, इतकेच नव्हे तर देशाचे संरक्षण राज्यमंत्रिपद भूषविणाºया डॉ. सुभाष भामरे यांनीदेखील ट्विटर हॅँडलवर चौकीदार लिहिलेले नाही.अकाउंटविना शहराध्यक्षनाशिक भाजपाचे अध्यक्ष असलेले आमदार बाळासाहेब सानप यांचे ट्विटर अकाउंटच नाही; परंतु ज्यांची आहेत त्यांच्या म्हणजेच खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल अहेर यांच्या कोणाच्याही नावापुढे चौकीदार लिहिलेले नाही. संघटनात्मक पदे ठीक, परंतु पक्षाने ज्यांना आमदारकी, खासदारकीची संधी दिली त्यांना चौकीदार म्हणवून घेण्यात कमीपणा वाटतो की काय, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.
‘चौकीदार’ बनण्यास भाजपा लोकप्रतिनिधी अनुत्सुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 1:27 AM
देशाचा चौकीदार होण्यासाठी अभिमानाने तयार असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर हॅँडलवर ‘चौकीदार नरेंद्र मोदी’ असे लिहिले आणि त्यापाठोपाठ भाजपात असे विशेषण स्वत:च्या नावापुढे लावण्याची मोहीमच सुरू झाली.
ठळक मुद्देअनभिज्ञता की कमीपणा : आमदार, खासदार दूर