त्र्यंबकेश्वर : भाजपा सरकारच्या केंद्र आणि राज्य सरकारला सत्तेत येऊन तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्र्यंबकेश्वर भाजपाने शहरातून रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला. भाजपा सरकारच्या या तीन वर्षांच्या कार्य काळातील यशस्वी अशा कामिगरीतील ऐतिहासिक निर्णय तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी पार पाडावी, अशा आवाहनाचे पत्रक घरोघरी जाऊन वितरित करण्यात आले. बळीराजाच्या कर्जमुक्तीसाठी ‘शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी’ या उद्देशाने महाराष्ट्र सरकारची वाटचाल सुरू आहे. यासाठी अडीच वर्षांत सरकारने ४०,००० कोटींची गुंतवणूक करून महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कामगिरी करणारे भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे असा दावा भाजपाने केला आहे.भाजपाने नोटाबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेऊन काळा पैसा बाळगणारांचे कंबरडे मोडले. वस्तू व सेवाकराचा (जीएसटी) निर्णय घेऊन देशभर एकच कर प्रणाली लागू केली. तीन वर्षांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचे एकही प्रकरण न घडता पारदर्शी कारभार करण्यात येत आहे. याशिवाय गरिबांसाठी सामाजिक लाभाच्या योजनांचा निधी थेट त्यांच्या खात्यावर जमा करणे, अधिकाराचे विकेंद्रीकरण आदीं केंद्र सरकारच्या निर्णयासह राज्य सरकारचे छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक कृषी सिंचनाच्या वेगवेगळ्या योजना, जलयुक्त शिवार, शेतीला चालना आदी असंख्य निर्णय घेऊन राज्य सरकारने यशस्वी कामिगरी करून राज्य सरकारने इतर सरकारपेक्षा वेगळी कामिगरी करु न दाखिवली असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
त्र्यंबकला भाजपाची रॅली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 12:44 AM