शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

भाजपाच्या स्टार शिलेदारांची ‘अग्निपरीक्षा’

By admin | Published: November 13, 2016 10:55 PM

दोन उगलेंच्या लढतीकडे नजरा : विठ्ठल उगले यांच्यासमोर बाळू उगले यांचे आव्हान

 शैलेश कर्पे सिन्नरमाजी आमदार माणिकराव कोकाटे यांचे विश्वासू व कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक विठ्ठल उगले यांच्यासमोर आमदार राजाभाऊ वाजे यांचे कार्यकर्ते माजी नगरसेवक बाळू उगले यांनी प्रभाग १ मध्ये कडवे आव्हान उभे केले आहे. दोघांमध्ये होणारी झुंज उत्सुकतेची तेवढीच भाजपाचे विठ्ठल उगले यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. व्ही राजे या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून पुढे आलेल्या विठ्ठल उगले यांनी गेल्या ७-८ वर्षांत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले. गेल्या निवडणुकीत त्यांनी नगरसेवक प्रमोद चोथवे या बलाढ्य उमेदवाराचा पराभव केल्याने पहिल्याच प्रयत्नात नगरसेवक झालेल्या विठ्ठल उगले यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडली होती. तरुण वयात विठ्ठल उगले यांना नगराध्यक्ष पद मिळाले होते. कडवा धरणातून राबविण्यात येत असलेल्या २४ तास पाणीपुरवठा योजनेत विठ्ठल उगले यांचा मोठा वाटा आहे. माजी आमदार कोकाटे यांच्या खांद्याला खांदा लावून उगले यांनी दिल्ली व मुंबई वाऱ्या करुन योजना अंतिम टप्प्यात आणून ठेवली आहे. विधानसभा निवडणुकीतही भाजपाचे उमेदवार कोकाटे यांची शहरातील प्रचाराची धुरा विठ्ठल उगले यांनी सांभाळली होती. गेल्या पाच वर्षांत शहरात राबविलेल्या कामांचे श्रेय हे जसे विठ्ठल उगले यांच्यासाठी जमेची बाजू असेल तसेच अनियमित पाणीपुरवठा, स्वच्छतेचा प्रश्न व अन्य असुविधांच्या बाबीतही त्यांनाच विरोधकांच्या टीकेला तोंड द्यावे लागणार आहे. याउलट गेल्या पाच वर्षांपूर्वी नगरपालिकेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही शिवसेनेचे उमेदवार बाळू उगले यांनी प्रभागातील जनसंपर्क कमी होऊ दिला नाही. अगदी झपाटल्यागत बाळू उगले यांनी संघटन उभे करुन मळहद्दीत आपल्या कामाचा बोलबाला केला. नगरपालिकेत चौदा महिन्यांच्या कालावधीत बाळू उगले यांनी कॉँग्रेसचे गटनेते म्हणून काम करतांना प्रभाव पाडला होता. त्यानंतर एकलव्य आदिवासी संघटना व शिवमुद्रा गु्रपच्या माध्यमातून बाळू उगले यांनी विविध समाजपयोगी कामे उभी केली आहे. निम्म्यारात्री कोणाच्याही मदतीला धावण्याचा बाळू उगले यांचा स्वभाव हीच त्यांची निवडणुकीतली ताकद आहे. समाजोपयोगी कामे राबविण्यात भाजपा व शिवसेना या दोन्ही उगले उमेदवारांचा हातखंडा आहे. त्यामुळे मतदार या दोघांपैकी कोणत्या उमेदवाराला आपलेसे करतात हा शहरवासियांसाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे. उमेदवारांसह मतदारांची परीक्षा पाहणारी ही निवडणूक ठरणार आहे. या दोन तुल्यबळ उमेदवारांच्या लढतीत राष्ट्रवादी-कॉँग्रेस आघाडीने डॉ. प्रमोद रामराव लोहार या नवख्या उमेदवाराला निवडणूक रिंगणात उभे केले आहे. या लक्षवेधी लढतीत डॉ. लोहार मतदारांवर आपला कसा आणि किती प्रभाव टाकतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सुशिक्षीत व बाराबलुतेदार संघटनेशी व राष्ट्रवादीचे काम करणाऱ्या डॉ. लोहार यांच्या उगले यांच्या तुल्यबळ व कडव्या झुंजीत कितपत टिकाव लागतो हे येणारा काळच सांगेल. प्रभाग १ ब मध्ये सर्वसाधारण जागेवर भाजपा व शिवसेना या दोन्ही उगले द्वयींमध्ये होत असलेली लढत सर्वांत कडवी व तुल्यबळ लढत मानली जात आहे. त्यात माजी नगराध्यक्ष भाजपाचे स्टार शिलेदार असल्याने पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. (वार्ताहर)