नाशिक- शहरातील खड्डे प्रकरणावर भाजपा वर शिवसेना आणि राष्ट्रवादीने टीकेची झोड उठवली असताना आता त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेली आहे. मनसे बरोबर सत्ता भोगणा-या भाजपाला आता शॉर्ट टर्म मेमरी लॉसचाविकार जडला आहे, खड्डे पडल्याने दोषींवर कारवाई करण्याचे सोडून हा पक्ष मनसेवर खापर फोडत असल्याची टीका जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी केला आहे.दुसरीकडे गुणवत्ता आणि नियंत्रण विभागावर कारवाई करण्याऐवजी त्यांची पाठराखण करीत असून मलिद्यात त्यांचे वाटेकरी झाल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. शहरात सध्या पावसामुळे सर्वत्र खडे पडले आहेत त्या पार्श्वभूमीवर अजय बोरस्ते आणि रंजन ठाकरे यांनी भाजपावर टीका केली होती. त्यावर उपमहापौरभिकुबाई बागुल, सभागृह नेते सतीश सोनवणे आणि गटनेता जगदीश पाटील यांनी उत्तर देताना भाजपाच्या चार वर्षाच्या सत्ता काळातील रस्ते चांगलेच आहेत.या आधीच्या पाच ते बारा वर्षाच्या काळात ज्यांची सत्ता होती, त्यांच्याच काळात खड्डे पडल्याचा टीका केली होती. या गेल्या पाच ते बारा वर्षात महापालिकेत मनसे आणि शिवसेनेची सत्ता होती. तसेच २०१२ मनसेच्या सत्तेला पहिल्या अडीच वर्षात भाजपचे पाठबळ होते. त्यामुळे भाजपच्या टीकेनंतर यापक्षाने देखील वादात उडी घेतली आहे. पावसामुळे शहरातील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेस जबाबदार असलेल्या दोषी अधिकारी व ठेकेदारावर तातडीने कारवाई होणे अपेक्षित असतांना भाजप त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या कर्म दरिद्री कारभाराचे खापर आधीच्या मनसेच्या सत्ताकाळावर फोडून स्वत:चे हसे करून घेत आहे, असे मनसेचे जिल्हाध्यक्ष अनंता सुर्यवंशीयांनी सांगितले. दरवर्षी पावसाळा संपल्यावर रस्ते दुरुस्तीच्या कामांची नव्याने निविदा काढून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असतो. फक्त एका महिन्यात सुमारे ९ हजार ४६२ खड्डे बुजविल्याचा दावा करून भाजपने आपल्याचभ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब केले आहे, असेही सूर्यवंशी यांनी सांगितले.मनसेने या ९ हजार ४६२ खड्ड्यांचे पालकत्व सिद्ध करण्याचे आव्हान देखील भाजपला दिले आहे. भाजपने खोटे दावे करून जनतेची दिशाभूल करू नये अन्यथा मनसेच्या वतीने याबाबत तीव्र जनआंदोलन करण्यात येईल असे त्यांनीसांगितले.खड्डयांवरून सेनेचाही टोलाभाजपने खड्यांवरून दिलेल्या प्रत्युत्तरावरून शिवसेनेने देखील टीकास्त्र सोडले आहे. भाजपाने मनसे आणि शिवसेनेच्या काळात उपमहापौर आणि अन्य पदे भूषविली होती. भाजपने सर्वांसोबत सत्तासुख घेवून आता मात्र नामनिराळे होण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याचे विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांनी म्हंटले आहे. खडड्डे पडल्याने रस्त्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे खडड्यांच्या मलिद्यात भाजपही वाटेकारी आहे काय असाप्रश्न बोरस्ते यांनी केला आहे.