फेब्रुवारीनंतर नाशिक जिल्ह्यात काेरेानाचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली. एप्रिलमध्ये तर उच्चांकी संख्या झाली होती. त्यानंतर आता काहीशी उतरण सुरू झाली असली तरी आता प्रशासनाने १२ ते २३ असे १२ दिवस जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन जाहीर केला आहे. यासंदर्भात पेशकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नवीन लॉकडाऊन म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असल्याचे म्हटले आहे. प्रशासनाच्या विविध विभागांकडून जनतेला जास्तीत जास्त संभ्रमीत केाण ठेवेल, यांची स्पर्धाच सुरू आहे. गेल्या सहा दिवसात नाशिक जिल्ह्यातील रुग्णसंख्या सहा हजारावरून दीड हजारावर आली असताना अचानक लॉकडाऊन कडक करून २३ तारखेपर्यंत उद्योग बंद ठेवण्याची भूमिका अनाकलनीय आहे. ज्या उद्योगांच्या क्षेत्रात कामगारांची राहण्याची सेाय आहे, अशा उद्योगांनाच परवानगी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात संपूर्ण जिल्ह्यात सिन्नर येथील एका कारखान्यातच ही सोय आहे, हे सुद्धा प्रशासनातील अधिकाऱ्यांना माहिती नाही, त्यामुळे पेशकार यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कारखान्यांनी घेतलेल्या ऑर्डर्स, त्यांचे वीज बिल, बँकांचे कर्ज हप्ते तसेच अन्य आर्थिक दायीत्व केाण पूर्ण करणार, असा प्रश्न त्यांनी केला आहे.
महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी तिसरी लाट रोखण्यासाठी हा निर्णय आवश्यक होता. कोणत्याही निर्णयामुळे सर्वांचे समाधान हेाणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
काेट...
नवीन बाधितांची संख्या कमी झाली असली तरी उपचाराधिन रुग्ण आजही वीस हजारावर आहेत. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी हा आवश्यक निर्णय हेाता. एप्रिलसारखी स्थिती पुन्हा होऊ द्यायची नसेल तर सर्वांनी सहकार्य केले पाहिजे.
- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका.
कोट...
लॉकडाऊनला विरोध नाही; मात्र राज्य सरकारने या आधी गोरगरीब विक्रेते, हातगाडीवाले या सर्वांना दिलेल्या पॅकेजचे पैसे हातात पडले का, याचा तर विचार करायला हवा होता.
- गिरीश पालवे, शहराध्यक्ष भाजप.