महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवारी (दि.२२) ऑक्सिजनची गळती होऊन २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी निष्काळजीवरून भाजप-सेनेत जुंपली आहे. महापालिकेत भाजपाची सत्ता असल्याने यासंदर्भात शिवसेनेने आरोप केल्यानंतर भाजपने सेनेवर आरोप केले होते. त्यानंतर आता बडगुजर यांनी खंडन केले आहे, तसेच या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशीही मागणी केली आहे. महापालिकेने ऑक्सिजन टाकी बसवून दहा वर्षेे देखभाल दुरुस्तीचा ठेका दिला आहे. त्यामुळे ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनीही तशीच मागणी केली आहे; मात्र दत्तक पालकाच्या बाबतीत काही बोलल्यास भाजपच्या जिव्हारी लागते आणि ते नैराश्येतून आरेाप करतात, असे बडगुजर यांनी नमूद केले आहे. महपाालिकेत भाजपची सत्ता असून, सर्व पदाधिकारी त्यांचेच आहेत. अशावेळी एखादा प्र्स्ताव आला तर त्याच्यावर सूचक आणि अनुमोदक म्हणून थेट त्यांचीच स्वाक्षरी असते. अशा प्रकारचा एखादा ठराव मंजूर होऊन वर्क ऑर्डर देण्यापूर्वी काय काय त्रास संबंधिताना सहन करावा लागतो, हे संबंधिताना चांगलेच माहिती आहे. शिवसेनेचा अशा ठेक्यांशी संबंध नाही आणि भाजपाने तसा दावा केला असेल तर त्याचे पुरावे सादर करावे, अशी मागणीही बडगुजर यांनी केली आहे.
ठेके भाजपाने द्यायचे आणि आरोप सेनेवर हे कसे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 4:15 AM