मशीनमध्ये गडबड झाल्यास भाजपाचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 01:02 AM2017-11-27T01:02:03+5:302017-11-27T01:02:49+5:30

गुजरातमधील निवडणूक ही तेथील जनता आणि मोदी यांच्यातच असून, यामध्ये तेथील जनतेचा विजय निश्चित आहे. मात्र वोटिंग मशीनमध्ये गडबड झाली तरच भाजपाला विजय मिळेल, असे प्रतिपादन कॉँग्रेसचे महाराष्टÑ प्रभारी के. मोहनप्रकाश यांनी केले.

BJP wins, if machine becomes disturbed | मशीनमध्ये गडबड झाल्यास भाजपाचा विजय

मशीनमध्ये गडबड झाल्यास भाजपाचा विजय

Next
ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनविकासाचा खरा चेहरा समोर आला आहेव्यापारीही मोदी धोरणाच्या विरोधात

नाशिक : गुजरातमधील निवडणूक ही तेथील जनता आणि मोदी यांच्यातच असून, यामध्ये तेथील जनतेचा विजय निश्चित आहे. मात्र वोटिंग मशीनमध्ये गडबड झाली तरच भाजपाला विजय मिळेल, असे प्रतिपादन कॉँग्रेसचे महाराष्टÑ प्रभारी के. मोहनप्रकाश यांनी केले.  नाशिक शहर कॉँग्रेस कमिटी येथे संविधान दिनानिमित्ताने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन कॉँग्रेसचे महाराष्टÑ प्रभारी के. मोहनप्रकाश यांच्या हस्ते झाले यावेळी ते पत्रकार परिदेत बोलत होते. नरेंद्र मोंदी यांनी २०१४ची निवडणूक ही गुजरातमधील विकासाच्या मुद्द्यावर लढविली होती. 
आता तेथील विकासाचा खरा चेहरा समोर आला आहे. गुजरातमधील शेतकरी आत्महत्या करीत आहे, तरुण बेरोजगार झाले आहेत तर व्यापारीही मोदी धोरणाच्या विरोधात आहेत. येथील व्यापारी ‘एकही भूल कमल का फूल’ असे बिलांवर लिहित आपली नाराजी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे येथील जनतेमध्ये मोदीच्या विरोधात असलेली भावना पाहता गुजरातच्या जनतेचाच विजय होईल, असे वाटते. भाजपा ज्या पद्धतीने निवडणुका जिंकत आहे त्याप्रमाणे जर वोटिंग मशीनमध्ये गडबड झाली तरच भाजपाला गुतरातमध्ये विजय मिळेल, असेही मोहनप्रकाश म्हणाले.  आजवर झालेल्या निवडणुकांनंतर अनेक पक्ष आणि व्यक्तींनी वोटिंग मशीनमधील गडबडीवर आक्षेप घेतला आहे. मध्य प्रदेशमधील राज्य निवडणूक आयोगाच्या महिला अधिकाºयानेच वोटिंग मशीनमधील गैरप्रकार उघड करून दाखविला आहे. वोटिंग मशीनमधील झोल हा तक्रारीनंतर लगेचच सिद्ध होईल, असेही नाही. त्यामुळे तत्काळ मशीनवर आक्षेप घेतला तरी त्याचा उपयोग होत नाही. परंतु जर या यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह असेल तर मग बॅलेटनुसार मतदानयंत्रणा राबविली पाहिजे, अशी मागणी अनेकदा अनेकांनी केल्याचे मोहनप्रकाश म्हणाले. लोकशाहीत जर अशाप्रकारचा आक्षेप वारंवार घेतला जात असेल तर केंद्राने पारदर्शकता आणली पाहिजे, असे ते म्हणाले.  दरम्यान, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात पांढरी टोपी आणि खादी परिधान करणाºयांचा समावेश होता, तर काळी टोपी घालणारे आरएसएसवाले कधीही स्वातंत्र्याच्या बाजूने नव्हते, तर त्यांची इंग्रजांशी जवळीत होती, असा आरोपही मोहनप्रकाश यांनी केला. संपूर्ण देश भारत छोडोच्या आंदोलनात असताना आरएसएस मात्र इंग्रजांबरोबर होती, असेही ते म्हणाले.
राम मंदिर निवडणुकीचाच मुद्दा
गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरएसएसने पुन्हा एकदा राम मंदिर निर्माण मुद्दा पुढे केला आहे. भाजपाचा मुद्दा देशासाठी काही नवीन नाही. कोणतीही निवडणूक आली की भाजपा-आरएसएस राम मंदिराचा मुद्दा पुढे करतात. गुजरात निवडणुकीतही भाजपाकडून विकासाचा नाही तर मंदिराचा मुद्दा पुढे केला जात आहे.

Web Title: BJP wins, if machine becomes disturbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.