पेठ : केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मंगळवारी (दि.७ ) पेठ तालुक्यात दौरा केला. करंजाळी येथे जेसीबीवरून पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
ग्रामीण रुग्णालय पेठ येथे भेट देऊन त्यांनी आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. पंचायत समितीत जि. प. सदस्य भास्कर गावित यांनी डॉ. भारती पवार यांचे स्वागत केले. यावेळी सभापती विलास अलबाड, नगराध्यक्ष मनोज घोंगे, उपसभापती पुष्पा पवार, तुळशीराम वाघमारे, पुष्पा गवळी, कुमार मोंढे, शामराव गावित, महेश टोपले, गणेश गवळी, विशाल जाधव आदी उपस्थित होते. त्यानंतर जनता विद्यालय सभागृहात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी विविध संघटना व राजकीय पक्षांकडून पेठ तालुक्याच्या विकासाबाबत निवेदने देण्यात आली. डांग सेवा मंडळाच्या अध्यक्ष हेमलता बिडकर यांनी त्यांचे स्वागत केले. केंद्र शासनाच्या ध्येयधोरणांबाबत डॉ. भारती पवार यांनी संबोधित केले. याप्रसंगी डॉ. प्रशांत भदाणे, तालुकाध्यक्ष संजय वाघ, शहराध्यक्ष त्रंबक कामडी, दिलीप पाटील, रमेश गालट, छगन चारोस्कर, संकेत नेवकर, जीवन जाधव, हेमंत कोरे, राहुल गाडगीळ, चंदर भांगरे, प्रमोद शार्दुल, जगन कुवर, रघुनाथ चौधरी, छबिलदास चौधरी, हिरामण मोळे, लताबाई गायकवाड, मंदाबाई बारे, संजय पोटींदे, अंबादास भोये, गोरख भांगरे, केशव कुवर, सागर डोगमाने आदी उपस्थित होते.
(०७ एनएसके) करंजाळी येथे डॉ. भारती पवार यांचे स्वागत करतांना पेठ तालुका भाजपचे पदाधिकारी.
070921\260607nsk_57_07092021_13.jpg
करंजाळी येथे डॉ. भारती पवार यांचे स्वागत करतांना पेठ तालुका भाजपचे पदाधिकारी.