येवला : भाजपने कॉँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा केली असली तरी सद्य:स्थितीत भाजपच कॉँग्रेसयुक्त झाली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपचे १५० पैकी ७० उमेदवार हे आयात केलेले आहेत. त्यामुळेच भाजपकडून खरोखरच पार्टी विथ डिफरन्स ही संकल्पना राबविली जात असल्याचा टोला राष्टÑवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी येवला येथे पत्रकार परिषदेत बोलताना भाजपला लगावला.सुप्रिया सुळे म्हणाल्या, प्रकरणे जुनी असताना विरोधी पक्षातील नेत्यांना निवडणुकीच्या अगोदरच नोटिसा दिल्या जात असल्याने हे दडपशाही करणारे सरकार आहे. प्रफुल्ल पटेल यांना निवडणुकीच्या तोंडावर नोटीस दिली जाते. कोर्टाची आॅर्डर, संबंधित पुरावे जर हे सरकार मानणार नसेल तर सर्वसामान्य जनतेचं काय, असा सवालही सुळे यांनीकेला.पक्षातीलच नेते शिवसेना उमेदवाराच्या प्रचारात सक्रि य सहभाग घेऊन पक्षविरोधी काम करत असल्याच्या प्रश्नावर सुळे यांनी सांगितले, संघटना ही पहिली असते, नंतर मतभेदांकडे पाहिले पाहिजे.संघटनेने निर्णय घेतला तर पक्ष पहिला आणि मतभेद बाजूला ठेवण्याची गरज आहे. ज्यांच्यावर पक्षाने प्रेम केले, त्यांच्याकडून पक्षविरोधी भूमिका घेतली जात असेल तर ही दुर्दैवी बाब आहे. संबंधितांवर कारवाई करण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, अंबादास बनकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.राष्ट्रवादीतील मोठा चेहरा म्हणून छगन भुजबळ यांच्याकडे बघितले जाते. मात्र निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा आवाज दडपला जात आहे. कुठलंही सरकार असो, त्यांनी प्रशासनाचा गैरवापर करू नये.
भाजपचे ७० उमेदवार आयाराम : सुप्रिया सुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 2:02 AM
भाजपने कॉँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा केली असली तरी सद्य:स्थितीत भाजपच कॉँग्रेसयुक्त झाली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपचे १५० पैकी ७० उमेदवार हे आयात केलेले आहेत. त्यामुळेच भाजपकडून खरोखरच पार्टी विथ डिफरन्स ही संकल्पना राबविली जात असल्याचा टोला राष्टÑवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी येवला येथे पत्रकार परिषदेत बोलताना भाजपला लगावला.
ठळक मुद्देहे तर दडपशाही करणारे सरकार!