सटाणा : बागलाण तालुक्यातील मुल्हेर येथील किल्ल्याच्या पायथ्याशी श्री उद्धव महाराजांच्या मंदिरासमोर तसेच श्रीपुरवडे येथील भीमाशंकर मंदिरासमोर बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या नेतृत्वाखाली घंटा नाद आंदोलन छेडण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी ’दार उघड उद्धवा दार उघड’ अशा घोषणा देत परिसरर दणाणून सोडला. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली करावीत, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली. आंदोलनात भाजपा तालुका उपाध्यक्ष रवींद्र गांगुर्डे, पंचायत समितीचे माजी सदस्य अभिमन ठाकरे, दत्ता तिवारी, विनोद शिंदे, आशाबाई जगताप, सुभाष येवले, सागर अिहरे, गौरव परदेशी, अनिल सत्पर्षी, सुनील चव्हाण, श्रीपुरवडे येथील रामदास पवार, सुदाम पवार, सचिन हिरे, बाबुलाल पवार, छोटू कुंवर, संजय शिम्परे, संतोष पवार, देविदास ठाकरे आदी सहभागी झाले होते.
मंदिरे खुली करण्यासाठी भाजपचे बागलाणमध्ये आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 5:30 PM
सटाणा : बागलाण तालुक्यातील मुल्हेर येथील किल्ल्याच्या पायथ्याशी श्री उद्धव महाराजांच्या मंदिरासमोर तसेच श्रीपुरवडे येथील भीमाशंकर मंदिरासमोर बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या नेतृत्वाखाली घंटा नाद आंदोलन छेडण्यात आले.
ठळक मुद्देमहाराष्ट्रातही सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली करावीत अशी मागणी