शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपाची मुसंडी

By admin | Published: February 24, 2017 12:07 AM

सेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपाची मुसंडी

 मालेगाव : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सात गटांपैकी पाच गटात भाजपाचे कमळ फुलले आहे, तर शिवसेनेला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. कळवाडी गटात झालेल्या काट्याच्या लढतीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांच्या पत्नी अंजली कांदे व निमगाव गटातील मधुकर हिरे यांचा धक्कादायक पराभव झाल्याने शिवसेनेच्या नेत्यांवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. तर पंचायत समितीत मतदारांनी सेना व भाजपाला समान कौल दिला आहे. पंचायत समितीच्या सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादी व अपक्ष म्हणून निवडून आलेल्या उमेदवारांच्या हातात आहेत.गेल्या पंधरा वर्षांपासून मालेगाव पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेनेची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांना कसरत करावी लागणार आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेकडे चार जिल्हा परिषदेचे गट ताब्यात होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत दाभाडी, रावळगाव, सौंदाणे, कळवाडी या सेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत आता भाजपाने या गटांमध्ये कमळ फुलविले आहे तर झोडगे गटावरील सत्ता अबाधित ठेवण्यास शिवसेनेला यश आले आहे तर वडनेर गटातील भाजपाच्या सत्तेला सुरुंग लागला आहे.पंचायत समितीत मतदारांनी शिवसेनेला सहा व भाजपाला सहा असा समसमान कौल दिला आहे. पंचायत समितीवर सत्ता मिळविण्यासाठी लागणारा मॅजिक आकडा भाजपा व शिवसेनेकडे नसल्यामुळे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. पंचायत समितीवर सत्ता मिळविण्यासाठी अपक्ष व राष्ट्रवादीच्या उमेदवाराची रसद लागणार आहे. ही रसद मिळविण्यासाठी भाजपा व शिवसेनेला मोठी कसरत करावी लागणार आहे. आमदार असताना दादा भुसे यांचा तालुक्यात करिष्मा चालत होता; मात्र आता ग्रामविकास राज्यमंत्री पद असताना गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत यंदा शिवसेनेला जिल्हा परिषद गटातील एक जागा व पंचायत समितीची एक जागा गमावण्याची नामुष्की ओढावली तर कळवाडी, रावळगाव, निमगाव या गटातील शिवसेनेच्या उमेदवारांचा झालेला पराभव शिवसेना नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे तर भाजपाने जोरदार मुसंडी मारत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सात गटांपैकी पाच गटांमध्ये सत्ता खेचून आणली आहे. शिवसेनेला केवळ दोन गटांमध्ये सत्ता टिकविता आली तर पंचायत समितीत जनतेनेच समान कौल दिला आहे. भाजपा व शिवसेनेशिवाय मतदारांना पर्याय नसल्यामुळे समान कौलचा निकाल समोर आला आहे. कट्टर विरोधकाची भूमिका बजावणाऱ्या राजकीय पक्षाला यापुढे तालुक्यात चांगले दिवस येण्याची शक्यताच या निकालातून दिसून येत आहे.