सिडको : भाजपने सलग दुसऱ्यांना नाशिक पश्चिम मतदारसंघावरील आपले वर्चस्व कायम ठेवले असून, भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे सुमारे ९,७४६ मताधिक्क्याने विजयी झाल्या आहेत. राष्टवादीचे उमेदवार अपूर्व हिरे यांनी दुसºया स्थानासाठी त्यांना कडवी झुंज दिली, तर सेनेचे बंडखोर विलास शिंदे हे पाचव्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.अतिशय अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपच्या सीमा हिरे यांन पहिल्या फेरीपासूनच सुमारे तीन हजार मतांनी आघाडी घेतली होती. ती त्यांनी विसाव्या फेरीपर्यंत कायम ठेवली. राष्ट्रवादीचे अपूर्व हिरे यांच्याशी त्यांची लढत कायम राहिली. विसाव्या फेरीनंतर मात्र सीमा हिरे यांची आघाडी वाढत गेली, तर माकपाचे डॉ. डी. एल. कराड हे तिसºया स्थानावर कायम राहिले. मनसेचे उमेदवार दिलीप दातीर यांनी चौथ्या क्रमांकाची मते घेतली. प्रत्येक फेरीत त्यांना दोन आकडी मते मिळाली, तर सेनेचे बंडखोर विलास शिंदे हे पाचव्या क्रमांकावर फेकले गेले. या निवडणुकीत सेनेने बंडखोरी केल्याने त्याचा फटका भाजपच्या सीमा हिरे यांना बसेल असा अंदाज व्यक्त केला जात होता, मात्र तो फोल ठरला. तर राष्टÑवादीने दुसºया क्रमांकावर झेप कायम ठेवली. सकाळी ८ वाजेपासून सुरू झालेली मतमोजणी तब्बल ११ तास चालली.विजयाची तीन कारणे...1सीमा हिरे यांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये मतदारसंघात केलेली कामे कामी आली.2पाच वर्षांपासून सातत्याने मतदारांशी असलेला संपर्क व महिला उमेदवार म्हणून त्यांना सहानुभूती मिळाली.3शिवसेनेने पश्चिम मतदारसंघ प्रतिष्ठेचा करून सीमा हिरे यांना पराभूत करण्याचा चंग उचलला होता, त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आणखी जोमाने कामाला लागले होते. त्यातच सेनेतही शेवटच्या क्षणी फूट पडून अनेकांनी हिरेंचे काम केले.अपूर्व हिरेंच्या पराभवाचे कारण...अपूर्व हिरे यांना राष्ट्रवादीने नामांकनाच्या शेवटच्या दिवशी पक्षाचा ए व बी फॉर्म दिला. मात्र पक्षाचे कार्यकर्ते कोठेही त्यांच्या प्रचारात दिसले नाही. मतदारसंघाबाहेरील व्यक्तींवरच हिरेंचा प्रचार अवलंबून राहिला. मतदारांशी थेट संपर्काचा अभाव.पराभूत उमेदवार पक्ष मिळालेली मते१ अपूर्व हिरे राष्टÑवादी 68,295२ दिलीप दातीर मनसे 25,501३ धोंडीराम कराड माकपा 22,657४ भीमराव जाधव बसपा 788५ दत्ता अंभोरे पीपल पार्टी आॅफ इंडिया 250६ मनीषा साळुंके ब.वि.आ. 225७ मंगेश पवार बहु.मु.पार्टी 84८ कोलप्पा धोत्रे अपक्ष 83९ देवकर्ण तायडे अपक्ष 82१० देवा वाघमारे अपक्ष 787११ नितीन सरोदे अपक्ष 426१२ बिपीन कटारे अपक्ष 2270१३ भिवा काळे अपक्ष 132१४ प्रा. मेहता नागभिडे अपक्ष 128१५ लंकेश शिंदे अपक्ष 300१६ विलास शिंदे अपक्ष 16,429१७ शिवाजी वाघ अपक्ष 161१८ सचिन अहिरराव अपक्ष 182
भाजपच्या सीमा हिरे यांचा दुसऱ्यांदा विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 1:12 AM