येवला : अंदरसूल भागात भाजपाची कार्यकारिणी जाहीर झाली. खासदार हरिश्चंद्र चव्हाण, माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्या हस्ते गावातील बिरोबा मंदिर सभागृहात नवीन नियुक्त्या देण्यात आल्या. येवला तालुका भाजपा उपाध्यक्षपदी प्रसिद्ध व्यापारी संतोष केंद्रे, अंदरसूल गाव अध्यक्षपदी संतोष मुथा, उपाध्यक्षपदी रतन जाधव, योगेश सुराडे, देवीदास धनगे, सरचिटणीस ज्ञानेश्वर खांदेशी, खजिनदार जगदीश पटेल, कार्यकारिणी सदस्य पोपट धनगे, आनंद ठोंबरे, पुरुषोत्तम सोनवणे, नितीन सुराडे, भागवत नेवासकर, उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार हरिश्चंद्र चव्हाण म्हणाले, भारतीय जनता पार्टी जगातील सर्वात मोठी राजकीय पार्टी आहे. आज देशात २१ राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. विकासासाठी पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करण्यास आपण खंबीरपणे देण्याची गरज आहे. माजी आमदार कल्याणराव पाटील यांचेही भाषण झाले. शहराध्यक्ष आनंद शिंदे, तालुकाध्यक्ष राजूसिंग परदेशी, ज्येष्ठ नेते गोरख खैरनार, पुंडलिक जाधव, दिनेश परदेशी, दत्ता सानप, गणेश गायकवाड, युवराज पाटोळे, मनीनाथ पवार, बडा शिंदे, राणा जाधव, संजय सोमासे, सागर नाईकवाडे, मयूर मेघराज, अक्र म शेख, कृष्णा भरते, किरण महाले, छगन दिवटे, सखाहरी लासुरे, सचिन ढमाले, असाराम देवरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा, नानासाहेब लहरे यांनी केले, तर आभार दत्ता सानप यांनी मानले.
भाजपाची अंदरसूल कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:11 AM