शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

भाजपच्या आऊटगोईंगला लवकरच सुरुवात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 4:17 AM

महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या कारकिर्दीत अखेरच्या वर्षात आयाराम-गयारामांचे पक्षबदल सुरू होतात. त्यात नवीन नसले तरी सत्तारूढ पक्षाला त्याचा चांगलाच फटका ...

महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या कारकिर्दीत अखेरच्या वर्षात आयाराम-गयारामांचे पक्षबदल सुरू होतात. त्यात नवीन नसले तरी सत्तारूढ पक्षाला त्याचा चांगलाच फटका बसतो. २०१२ मध्ये मनसेचे ४० नगरसेवक निवडून आले होते. शेवटच्या वर्षी म्हणजेच २०१७ मध्ये त्यातील ३० नगरसेवक अशाच प्रकारे माघारी परतल्याने या पक्षाची अवस्था केविलवाणी झाली होती. त्यानंतर केंद्र आणि राज्यातील लाटेमुळे भाजपने २०१७ मध्ये बहुमत मिळवले. या पक्षाचे ६६ नगरसेवक निवडून आले असले तरी या पक्षाचे मूळ कार्यकर्ते अवघे ९ आहेत. बाकी सर्व आयाराम मनसे, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून निवडून आलेले आहेत. त्यामुळे जोपर्यंत भाजपला अनुकूल वातावरण आहे तोपर्यंत असे आयाराम राहणार आणि वर्षाच्या अखेरीस ते मूळ किंवा ज्या पक्षाची चलती त्या पक्षात जाणार हे उघड आहे.

मध्यंतरी भाजपतून माजी आमदार वसंत गिते आणि सुनील बागुल हे त्यांच्या मूळ पक्षात म्हणजे शिवसेनेत प्रविष्ट झाले. त्याचवेळी त्यांचे समर्थक आता बाहेर पडणार हे स्पष्ट झाले होते. मात्र, त्यावेळी अनेकांनी सबुरीचे धोरण स्वीकारले. वसंत गिते यांचे सुपुत्र प्रथमेश गिते यांना यंदाच्या पहिल्यांदाच निवडून आल्यानंतरही भाजपने उपमहापौरपद दिले होते, तर सुनील बागुल यांच्या मातोश्री भिकूबाई बागुल विद्यमान उपमहापौर आहेत. गिते यांचे आठ ते दहा समर्थक भाजपत असल्याचे सांगितले जाते. तसेच बागुल यांचे काही समर्थक तसेच मूळ शिवसेनेतून आलेलेदेखील स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत. शनिवारी (दि.२८) प्रथमेश गिते यांनी संजय राऊत यांची भेट घेतली असली तरी एकाचवेळी भाजपला मोठा दणका देण्याची शिवसेनेची तयारी असल्याचे वृत्त आहे.

इन्फो...

अपक्ष काँग्रेसच्या वाटेवर

अपक्ष नगरसेवक मुशीर सैय्यद हे काँग्रेस पक्षात जाणार असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश सोहळा होणार आहे. आणखी एक- देान अपक्षदेखील काँग्रेस पक्षाच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे.

इन्फो...

मनसेतही इनकमिंग हेाणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये पुन्हा लक्ष घातल्यानंतर आता मनसेतून गेलेले काही नगरसेवकदेखील परतीच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आयाराम -गयारामांची चर्चा रंगली आहे.