शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
2
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
3
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
4
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
5
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
6
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
7
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
8
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
9
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
10
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
11
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
12
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
13
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
14
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
15
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
16
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
17
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
18
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
19
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
20
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू

भाजपातील ‘पाडापाडी’ आता चव्हाट्यावर !

By admin | Published: March 03, 2017 1:10 AM

नाशिक : भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांनीच पक्षाच्या उमेदवारांना मते देऊ नका, असे सांगितल्याची एक कथित ध्वनिफीत प्रसारित झाली आहे.

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या आधी तिकीटविक्री प्रकरणाने गाजलेल्या भाजपासाठी आता आणखी एक डोकेदुखी पुढे आली आहे. भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांनीच पक्षाच्या उमेदवारांना मते देऊ नका, असे सांगितल्याची एक कथित ध्वनिफीत प्रसारित झाली आहे. त्यामुळे पक्षाला धक्का बसला आहे. याबाबत योग्य ती तपासणी करण्यात येईल, असे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केले आहे.भाजपाच्या पश्चिम नाशिक विधानसभा क्षेत्राच्या आमदार असलेल्या सीमा हिरे यांच्या कन्येला नाशिक महापालिकेसाठी उमेदवारी नाकारण्यात आली होती; मात्र प्रभाग सातमध्ये त्यांचे दीर योगेश हिरे यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे केवळ त्यांनाच मते द्या अन्य उमेदवाराला मते देऊ नका, तसेच प्रभाग ८ मध्ये भाजपाचे उमेदवार अमोल पाटील यांना मते देऊ नका, असे एका कार्यकर्त्याला सांगितले जात असल्याची ध्वनिफीत अचानक सोशल मीडियावर प्रसारित झाली. त्यामुळे भाजपांतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. विशेष म्हणजे गेल्या २३ तारखेला मतमोजणी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपा कार्यालयात नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्काराच्या वेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचे सांगत त्यासंदर्भात पुरावे प्राप्त झाल्याचे म्हटले होते. दरम्यान, सीमा हिरे यांनी मात्र या प्रकाराचा इन्कार केला आहे. तर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सर्व प्रकारची पडताळणी करू, असे अगोदरच सांगितल्याचे माध्यमांना स्पष्ट केले आहे.महापालिका निवडणुकीच्या वेळी प्रत्येक उमेदवाराकडून दोन दोन लाख रुपये जमा केले जात असल्याची चित्रफीत प्रारंभी प्रसारीत झाली होती. भाजपाने त्याचे समर्थन केले होते व प्रचारासाठी हा निधी वापरला जाणार असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर भाजपाच्या कामगार आघाडीचे नेते गोपाळ पाटील यांनी पक्षाला दहा लाख रुपये दिल्याची चित्रफीत प्रसारीत झाली होती. त्यावेळी भाजपाने हात झटकले आणि विरोधकांवर खापर फोडले होते. आता मात्र पक्षाच्या आमदारावरच शंका घेणारी ध्वनीफीत पुढे आल्याने भाजपात गोंधळ सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)