यावेळी परिस्थिती भाजपासाठी अनुकूल होती. नुकत्याच झालेल्या देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाच्या केदा अहेरांनी दिग्गजांचा पराभव करीत बाजार समितीत एकहाती सत्ता प्राप्त केली होती. त्यामुळे तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांत उत्साह होता. लोकसभा निवडणुकीत हे कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागले. केदा अहेर यांनी गावागावात कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या केदा अहेरांना भाजपाचे तिकीट मिळविताना गत विधानसभा निवडणुकीत भाजपातर्फे उमेदवारी केलेल्या अरुण आहेरांनी आव्हान उभे केले आहे. गत विधानसभा निवडणुकीनंतर अज्ञातवासात गेलेल्या अरुण अहेरांनी तालुक्यातील जनतेच्या भेटीगाठी घेऊन आपला संपर्क वाढविण्यास सुरुवात केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आतापासून राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. * हरिश्चंद्र चव्हाणांचा सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी असलेला थेट संपर्क त्यांच्या कामी आला. * भाजपाचे पाशा पटेल, पंकजा मुंडे यांची देवळा येथे प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात झालेली सभा मतदारांना प्रभावित करून गेली.* युवा मतदारांवर मोदी फॅक्टरचा पडलेला प्रभाव. तसेच उमराणे गटात आपला प्रभाव पाडण्यात डॉ. भारती पवार यश आले नाही.
देवळ्यात भाजपाची स्थिती मजबूत जोड
By admin | Published: May 18, 2014 7:57 PM