शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
3
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
4
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
5
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
6
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
7
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
8
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
9
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
10
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
11
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
12
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
14
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
15
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
16
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
17
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
18
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
19
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

पाणीवाटपाबाबत भाजपाची अडचण

By admin | Published: October 20, 2015 11:25 PM

सर्वपक्षीय बैठकीकडे पाठ : पाणी न देण्यावर राजकीय पक्ष ठाम

नाशिक : गंगापूर धरणातील १.३३ टीएमसी पाणी मराठवाड्यातील जायकवाडी धरणात सोडण्याच्या प्रश्नावर शिवसेनेच्या पुढाकाराने बोलविण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीकडे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविली. सत्ताधारी सेना-भाजपा युतीच्या राज्यात भाजपाकडे जलसंपदा खात्याचा कारभार आणि त्यातही जिल्ह्याचे पालकमंत्रिपद जलसंपदा मंत्र्यांकडे असल्याने पाणीवाटपाच्या मुद्द्यावरून अन्य राजकीय पक्षांनी पाणी पेटविले असताना भाजपाची मात्र ठोस भूमिका घेण्यास अडचण झाली आहे. दरम्यान, सर्वपक्षीय बैठकीत मराठवाड्याला एकही थेंब पाणी न देण्याचा निर्धार करतानाच प्रसंगी न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला.गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने गंगापूर धरणातून जायकवाडी धरणात १.३३ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातील सर्व पक्षांनी मतभेद विसरून एकत्र येत विरोध दर्शविला आहे. पाणीवाटपाच्या मुद्द्यावर शिवसेनेचे महानगरप्रमुख व मनपातील गटनेते अजय बोरस्ते यांनी मंगळवारी सर्व पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला कॉँग्रेस-राष्ट्रवादी, रिपाइंपासून ते आम आदमी पार्टीपर्यंतच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून पाणीवाटपाला विरोध दर्शविला असताना बैठकीकडे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविली. अजय बोरस्ते यांनी बैठकीसाठी भाजपाचे लक्ष्मण सावजी, संभाजी मोरुस्कर यांनाही निमंत्रित केले होते; परंतु त्यांनी त्यांच्या अनुपस्थितीबद्दल भाष्य करणे टाळले.

‘गंगापूर’ऐवजी ‘दारणा’तून पाणी सोडा

बैठकीत जलचिंतन संस्थेचे पदाधिकारी व अभियंता राजेंद्र जाधव यांनी पाणीसाठ्यासंबंधीची वस्तुस्थिती कथन केली. गंगापूर धरण समूहात सध्या ६ टीमसी पाणी शिल्लक आहे. त्यात महापालिकेकडून ४५०० दलघफू पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे. त्यातील ५०० दलघफू पाणी सिंहस्थासाठी राखीव ठेवण्यात आले होते. त्यातही पालिकेने कपात करत निम्मेच पाणी वापरले. शहरातही पाणीकपात सुरू करण्यात आली आहे. अशा स्थितीत जुलै २०१६ पर्यंत पाऊस न पडल्यास शहरावर गंभीर पाणीसंकट उद्भवू शकते. त्यामुळे गंगापूर धरणातील ५१० दलघफू पाणीसाठा पिण्यासाठी राखूनच ठेवला पाहिजे. गंगापूर धरणाऐवजी दारणा धरणातून पाणी सोडता येऊ शकेल.