मराठवाडामधून या अभियानाला प्रारंभ होईल. दि.१ ते ६ सप्टेंबरदरम्यान उत्तर महाराष्ट्रात या यात्रेतर्फे जागर केला जाणार आहे, अशी माहिती अभियानाचे अध्यक्ष प्रकाश चित्ते व ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक पवार यांनी दिली.
भाजपच्या संपर्क कार्यालयात चित्ते व पवार यांनी जागरण अभियान यात्रेची नियोजन आढावा बैठक घेतली. भाजप ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशकडून या अभियान यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी अभियान अध्यक्षपदी चित्ते यांची नियुक्ती केली आहे. चित्ते यांनी यात्रेचा नियोजित मार्ग, कार्यक्रम, सभास्थळे याविषयी चर्चा केली. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण विद्यमान राज्य सरकारमुळे गेले आहे, ते परत मिळवण्यासाठी समाज संघटित करण्याच्या उद्देशाने यात्रा यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले. या यात्रेत माजी केंद्रीय मंत्री व खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी पर्यटनमंत्री व आमदार जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत सटाणा येथून भाजप जिल्हा कार्यक्षेत्रात यात्रा काढण्यात येणार आहे. बागलाणसह मालेगाव शहर, तालुक्यातून निघणाऱ्या यात्रेत बारा बलुतेदार व अठरा पगड जातीच्या समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन चित्ते व पवार यांनी शेवटी केले. यावेळी भाजप गटनेते सुनील गायकवाड, व्यापारी आघाडीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नितीन पोफळे यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीला महानगर अध्यक्ष मदन गायकवाड, तालुका अध्यक्ष कैलास शेवाळे, जिल्हा सरचिटणीस संजय सानप, पंकज शेवाळे, कैलास शर्मा, ज्ञानेश्वर वाघ, जयप्रकाश पठाडे, विजय इप्पर, शरद आहिरे, रोहित वारुळे, दीपक देसले यांच्यासह भाजप ओबीसी मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.