चांदवड : तालुक्यात जिल्हा परिषदेच्या चार गटात भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना प्रत्येकी एक जागा तर आठ गणांत भाजपा ३, शिवसेना २, राष्ट्रवादी २, काँग्रेस १ असे संख्याबळ प्राप्त झाले. त्यात तळेगाव रोही गटात डॉ. आत्माराम कुंभार्डे (भाजपा), दुगाव गटात डॉ. सयाजीराव गायकवाड (राष्ट्रवादी), वडाळीभोई गटात कविता धाकराव (शिवसेना), वडनेरभैरव गटात शोभा कडाळे, (काँग्रेस) विजयी झाले, तर तालुक्यातील आठ गणांतील दुगाव गणात निर्मला आहेर (काँग्रेस), मेसनखेडे गणात शिवाजी सोनवणे (राष्ट्रवादी), तळेगाव रोही गणात ज्योती आहेर (भाजपा), वाहेगाव साळ गणात डॉ. नितीन गांगुर्डे (भाजपा), मंगरूळ गणात पुष्पा धाकराव (भाजपा), वडाळीभाई नितीन आहेर (शिवसेना), धोडंबे गणात ज्योती भवर (शिवसेना), वडनेरभैरव गणात अमोल भालेराव (राष्ट्रवादी) हे निवडून आले आहेत. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत दुगाव गटात राष्ट्रवादीचे डॉ. सयाजीराव गायकवाड ११,६७७ मते मिळवून विजयी झाले. दुगाव गणात राष्ट्रीय कॉँग्रेसच्या निर्मला संजय अहेर या ५,९०१ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी भाजपाच्या गौरी अरुण गांगुर्डे यांचा २००७ मतांनी पराभव केला. तळेगावरोही गटात भाजपाचे डॉ. आत्माराम पोपटराव कुंभार्डे यांनी कॉँग्रेसचे राहुल शिरीषकुमार कोतवाल यांचा १,२०८ मतांनी पराभव केला. तळेगावरोही गणात भाजपाच्या ज्योती देवीदास अहेर यांनी कॉँग्रेसच्या अनिता घुमरे यांचा पराभव केला. वाहेगावसाळ गणात-भाजपाचे डॉ. नितीन विठ्ठलराव गांगुर्डे यांनंी कॉँग्रेसचे सुनील ठाकरे यांचा १,८३२ मतांनी पराभव केला. वडाळीभोई गटात शिवसेनेच्या कविता भाऊसाहेब धाकराव यांनी राष्ट्रवादीच्या ज्योती धाकराव यांचा ९५९ मतांनी पराभव वडाळीभोई गणात शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन रघुनाथ अहेर विजयी झाले़ (वार्ताहर)
चांदवड तालुक्यात भाजपा शिवसेनेचे वर्चस्व
By admin | Published: February 24, 2017 12:26 AM