शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
Maharashtra Politics : भाजप अर्धे मंत्रिमंडळ स्वतःकडे ठेवणार! शिवसेना आणि राष्ट्रवादीला काय मिळणार?
3
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
4
तुम्ही एकाच वेळी २५६ लोकांना पाठवू शकता मेसेज; WhatsApp ची 'ही' ट्रिक माहितीय का?
5
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
6
Zomato चे CEO दीपिंदर गोयल २ वर्षांसाठी वेतन घेणार नाहीत, ३.५ कोटींचं पॅकेज; कारण काय?
7
Aditi Sharma : "१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
8
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
9
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
10
Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!
11
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
12
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
13
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
14
'सिंघम अगेन'बद्दल नाना पाटेकरांचं रोखठोक मत; म्हणाले - "बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची..."
15
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
16
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
17
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
18
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
19
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
20
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट

शिक्षण सभापतिपदी भाजपाच्या सोनवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 11:39 PM

नाशिक महापालिकेच्या शिक्षण समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या प्रा. सरिता सोनवणे यांची निवड करण्यात आली.

नाशिक : नाशिक महापालिकेच्या शिक्षण समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या प्रा. सरिता सोनवणे यांची निवड करण्यात आली. बहुमत भाजपाच्या बाजूने असूनही या निवडणुकीत शिवसेनेनेही उमेदवार उभा करून भाजपांतर्गत गटबाजीचा लाभ उचलण्याचा केलेला प्रयत्न फसून सभापती, उपसभापतिपदी सेनेचे उमेदवार पराभूत झाले. उपसभापतिपदी भाजपाच्याच प्रतिभा पवार यांची निवड करण्यात आली.शिक्षण समितीवर भाजपाचे पाच, सेनेचे तीन व एक कॉँग्रेसचा सदस्य असल्याने साहजिकच भाजपाचा वरचष्मा असला तरी, सेनेने ही निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून सुदाम डेमसे यांना सभापतिपदाची उमेदवारी दिली होती. तर भाजपाकडून सभापतिपदासाठी सरिता सोनवणे व उपसभापतिपदासाठी प्रतिभा पवार या दोघांनी उमेदवारी देऊन त्यांचे नामांकनही दाखल केले होते. परंतु सेनेने या निवडणुकीत चमत्कार करण्याच्या दृष्टीने दोन्ही जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले.राहुल दिवे उशिराने दाखलया निवडणुकीत भाजपाच्या विरोधात सेनेने उमेदवार दिल्यामुळे निवडणूक चुरशीचीही होईल, असा अंदाज बांधण्यात येत होता. कॉँग्रेसचे एकमेव उमेदवार राहुल दिवे यांनी सेनेला पाठिंबा दिला असला तरी, प्रत्यक्षात सभापतिपदाच्या निवडणुकीनंतर ते सभागृहात दाखल झाले. शिक्षण सभापतीची निवडणूक आज असल्याचे माहीत नव्हते, असा आश्चर्यकारक खुलासा त्यांनी केला. त्यामुळे उपसभापतिपदाच्या निवडणुकीत सेनेला दिवे यांचे एक मत अधिक मिळाले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBJPभाजपा