त्र्यंबकेश्वर : नगराध्यक्षपद निवडणुकीच्या मतदानात शिवसेनेच्या सिंधूताई दत्ता मधे यांना आठ, तर भाजपाच्या उमेदवार विजया दीपक लढ्ढा यांना नऊ मते मिळून त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षपदी लढ्ढा या बहुमताने विजयी झाल्या.पीठासन अधिकारी म्हणून इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी बाळासाहेब वाक्चौरे होते. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी एन. एम. नागरे यांनी काम पाहिले.दरम्यान, निवडणुकीसमयी अंजनाबाई कडलग यांनी दुपारी १.३० वाजता उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर पावणेदोनच्या सुमारास योगेश तुंगार, धनंजय तुंगार, यशवंत भोगे, विजया लढ्ढा, अनघा फडके, आशा झोंबाड, यशोदा अडसरे, अभिजित काण्णव हे एकत्र सभागृहात आले. त्यांच्या समवेत संतोष कदम नव्हते. कदम येईपर्यंत नगरसेवकांना धाकधुक वाटत होती. मात्र थोड्याच वेळात संतोष कदम आले. त्यावेळी पोलिसांच्या गराड्यात सुरक्षितपणे ते सभागृहात आले आणि नगरसेवकांचे चेहरे खुलले. थोड्या वेळात रवींद्र सोनवणे, ललित लोहगावकर, रवींद्र गमे, सिंधू मधे, अंजना कडलग, शकुंतला वाटाणे, तृप्ती धारणे व अलका शिरसाट हे आठ जण सभागृहात पोहोचले. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया पार पडली.सहायक पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी बंदोबस्ताची धुरा सांभाळली. पोलीस उपविभागीय अधिकारी देवराज, त्र्यंबक पोलीस स्टेशनचे देवीदास पाटील, नाशिक तालुका पोलीस निरीक्षक उपासू, सहायक पोलीस निरीक्षक गणेश परदेशी, राजू दिवटे, रमेश पाटील, दिलीप वाजे आदिंनी चोख बंदोबस्त ठेवला. (वार्ताहर)
त्र्यंबकच्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या विजया लढ्ढात्
By admin | Published: December 28, 2015 10:38 PM