शेतकऱ्यांनी सिंधू बॉर्डरवर आंदोलन सुरू करून सहा महिने पूर्ण झाले आहेत. तरीदेखील मोदी सरकार हे कायदे मागे घेण्यास तयार नाही. सदर कायदे मागे घ्यावेत. कामगार व शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कामगारांनी आपापल्या शिफ्टनुसार कंपनीच्या गेटजवळ जमून काळे झेंडे दाखविले. काळा दिवस पाळून मोदी सरकारच्या या शेतकरी-कामगार विरोधी कायद्यांचा व धोरणांचा निषेध करण्यात आला. कामगारांनी गेटवर सोशल डिस्टन्स ठेवून तोंडाला मास्क लावून आंदोलन केले.
फोटो - २८ सिन्नर कामगार
सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथे रिंग प्लस अॅक्वा कारखान्याच्या प्रवेशद्वारावर मोदी सरकारविरोधी घोषणाबाजी करताना कामगार वर्ग.
===Photopath===
280521\28nsk_29_28052021_13.jpg
===Caption===
फोटो - २८ सिन्नर कामगार सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथे रिंग प्लस अॅक्वा कारखान्याच्या प्रवेशद्वारावर मोदी सरकारविरोधी घोषणाबाजी करताना कामगारवर्ग.