नाशिक : डोक्यावर ‘मी भुजबळ’ अशी घातलेली टोपी, हातात भुजबळ समर्थकाचा पिवळा झेंडा व राज्य सरकार मुर्दाबादच्या काळ्या कपड्यानिशी दिल्या जाणाºया घोषणांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार दणाणून गेले. निमित्त होते, राज्याचे नेते व सध्या तुरुंगात असलेले छगन भुजबळ यांना जाणून बुजून जामीन नाकारून तुरुंगात अडकवून ठेवल्याच्या निषेधार्थ भुजबळ समर्थक समन्वय समितीने पुकारलेल्या सत्याग्रह आंदोलनाचे. जिल्'ाचे माजी पालकमंत्री व आमदार छगन भुजबळ व पुतणे समीर भुजबळ हे गेल्या २२ महिन्यांपासून तुरुंगात अटकेत असून, त्यांच्याविरुद्ध सरकार सुडबुद्धीने कारवाई करीत असल्याचा आरोप करून राज्यभरातील छगन भुजबळ समर्थकांकडून ठिकठिकाणी शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करण्याचे ठरविण्यात आले, त्याचाच भाग म्हणून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्'ातील प्रत्येक तहसीलदार कार्यालयासमोर भुजबळ समर्थकांनी दिवसभर सत्याग्रह केला. सकाळी दहा वाजता मोठ्या संख्येने भुजबळ समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धडक देत, केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ घोेषणा बाजी केली. ‘ वी वॉन्ट जस्टीस’, ‘भुजबळ मांगे जस्टीस’, ‘भुजबळ साहेब झिंदाबाद’, ‘राज्य सरकार मुर्दाबाद’ अशा घोषणा देत समर्थकांनी रस्त्यावर धाव घेतली. त्यामुळे काहीकाळ जुना आग्रारोडवरील वाहतूक खंडित झाली. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.यावेळी शिष्टमंडळाने समन्वय समितीच्या वतीने तयार करण्यात आलेले मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांना सादर केले. त्यात म्हटले आहे की, महाराष्टÑाच्या राजकारणात पन्नास वर्षे वाटचाल करणारे व दलित, ओबीसी, अल्पसंख्याकांचे नेतृत्व करणारे छगन भुजबळ यांना राजकीय हेतूने प्रेरित होऊन विद्यमान सरकारकडून खोटे नाटे आरोपांवर तुरुंगात डांबण्यात आले आहे. यात कायद्याचे उल्लंघन करण्यात आले असून, भुजबळ यांनी तपास यंत्रणेला संपूर्ण सहकार्य करूनही निव्वळ तांत्रिक कारणे पुढे करून त्यांच्या सुटकेत अडथळे निर्माण केले जात आहेत, शिवाय काही तथाकथित लोकांना हाताशी धरून न्यायालयाची दिशाभूल करण्याचे काम पद्धतशीरपणे केले जात असून, हा सारा प्रकार म्हणजे भुजबळ यांची राजकीय कारकिर्द संपविण्याचेच षडयंत्र असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जनभावनेचा विचार करून छगन भुजबळ, समीर भुजबळ यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही त्यात करण्यात आली आहे.यावेळी माजी खासदार देवीदास पिंगळे, आमदार जयंत जाधव, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नाना महाले, गजानन शेलार, माजी आमदार दिलीप सोनवणे, जी. जी. चव्हाण, प्रेरणा बलकवडे, अनिता भामरे, जयश्री चुंभळे, शोभा मगर, विष्णुपंत म्हैसधुणे, बाळासाहेब कर्डक, संजय खैरनार, अर्जुन टिळे, संतोष सोनपसारे, मनोहर बोराडे, मधुकर जेजूरकर, बाजीराव तिडके, अविनाश अरिंगळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.आंदोलकांनी वेधले लक्षभुजबळ समर्थक समन्वय समितीच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक समर्थकाला ‘मी भुजबळ’ असे लिहिलेली टोपी आयोजकांकडून देण्यात आली होती, शिवाय हातात छगन भुजबळ यांची छबी असलेला पिवळा रंगाचा झेंडा प्रत्येकाच्या हातात होता. या सत्याग्रहात पक्ष, जात, धर्म भेद विसरून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आल्यामुळे राष्टÑवादी कॉँग्रेस, रिपब्लिकन पक्ष, कॉँग्रेसचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने आपापल्या पक्षाचे झेंडे घेऊन सहभागी झाले होते.विरोधक झाले समर्थकछगन भुजबळ यांच्याविषयी पक्षात राहून जाहीर नाराजी व्यक्त करणारे तसेच त्यांच्यावर जाहीर टीका करणारे राष्टÑवादी पक्षाचे काही नेतेही या सत्याग्रह आंदोलनात उतरल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. विशेष म्हणजे या नेत्यांनी डोक्यावर ‘मी भुजबळ’ अशी टोपी घातल्यामुळे हा विषय चर्चेचा झाला होता. भुजबळ यांची कारागृहातून सुटका होण्याची शक्यता गृहीत धरून या नेत्यांनी आपली विरोधाची धार कमी केली की, त्यांचे मनपरिवर्तन झाले हे मात्र समजू शकले नाही.
भुजबळ समर्थकांचा ‘काळा दिवस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 12:24 AM
नाशिक : डोक्यावर ‘मी भुजबळ’ अशी घातलेली टोपी, हातात भुजबळ समर्थकाचा पिवळा झेंडा व राज्य सरकार मुर्दाबादच्या काळ्या कपड्यानिशी दिल्या जाणाºया घोषणांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार दणाणून गेले. निमित्त होते, राज्याचे नेते व सध्या तुरुंगात असलेले छगन भुजबळ यांना जाणून बुजून जामीन नाकारून तुरुंगात अडकवून ठेवल्याच्या निषेधार्थ भुजबळ समर्थक समन्वय समितीने पुकारलेल्या सत्याग्रह आंदोलनाचे.
ठळक मुद्देसरकारवर आरोप : राजकीय कारकीर्द संपविण्याचे सूडबुद्धीने कारवाईचे षडयंत्रजिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार दणाणून गेले