शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

शवविच्छेदनगृहात काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:32 AM

जिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय शिक्क्यांसह अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांची प्रतिकृती तयार करून बेकायदेशीररीत्या विविध प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याचा काळाबाजार उघडकीस आला असून, विशेष म्हणजे या प्रकरणातील संशयित आरोपी मंगळे साळवे व त्याचा अज्ञात साथीदार रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात राहूनच हा सर्व प्रकार करीत असल्याचे समोर आले असून, या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मंगळे साळवेसह त्याच्या अज्ञात साथिदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देबोगस शिक्के प्रकरण : मनपा कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल; प्रशासनाने मागविला अहवाल

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय शिक्क्यांसह अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांची प्रतिकृती तयार करून बेकायदेशीररीत्या विविध प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याचा काळाबाजार उघडकीस आला असून, विशेष म्हणजे या प्रकरणातील संशयित आरोपी मंगळे साळवे व त्याचा अज्ञात साथीदार रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात राहूनच हा सर्व प्रकार करीत असल्याचे समोर आले असून, या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मंगळे साळवेसह त्याच्या अज्ञात साथिदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणीतील आरोपीने आपल्या ताब्यात एका बॅगमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक नाशिक यांचा गोल रबरी स्टॅम्प, एक आडवा रबरी स्टॅम्प, तसेच अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांचा एक आडवा रबरी स्टॅम्प यासोबत कोऱ्या वैद्यकीय प्रमाणपत्रांचा गठ्ठा असल्याचा मिळून आला आहे. रबरी स्टॅम्पसह हे सर्व साहित्य आरोपीने बेकायदेशीररीत्या वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी आपल्या अज्ञात साथीदाराच्या मदतीने तयार करून आपल्या कब्जात बाळगले म्हणून रुग्णालय अधीक्षक नानासाहेब निकम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी (दि.१५) पोलिसांनी याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयाचा शिक्का रुग्णालय प्रशासनाबाहेरील व्यक्तीकडे आढळल्याने एकच खळबळ उडाली असून, या शिक्क्यांचा विविध कारणांसाठी गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनाबाहेरील व्यक्तीकडे आढळलेले शिक्के हे बनावट असून, त्याने बाजारपेठेतील शिक्के तयार करणाºया कारागिराकडून तयार करून घेतल्याचा संशय जिल्हा प्रशानाने व्यक्त केला आहे.प्रशासनाकडून अहवालानंतर कारवाईदरम्यान, सदरचा प्रकार चर्चेत आल्यानंतर महापालिकेने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून प्रशासन उपआयक्त महेश बच्छाव यांनी संबंधित खातेप्रमुखांकडून अहवाल मागविला आहे. सदरचा कर्मचारी हा सफाई कर्मचारी असल्याने थेट चौकशी न करता प्रशासनाकडूनअहवाल मागविला आहे. त्यानंतर त्यावर कारवाई केली जाणार असल्याचे वृत्त आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी