शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

रेमडेसिविरचा काळाबाजार ; दोघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 4:15 AM

सिडको : कोरोनाच्या आजारात उपचारासाठी वापरले जाणारे रेमडेसिविर इंजेक्शन जादा दराने विकणाऱ्या दोघा संशयितांना सापळा रचून पोलिसांनी अटक ...

सिडको : कोरोनाच्या आजारात उपचारासाठी वापरले जाणारे रेमडेसिविर इंजेक्शन जादा दराने विकणाऱ्या दोघा संशयितांना सापळा रचून पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आणखी संशयित असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यादृष्टीने तपास केला जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी दिली.

सिडकोतील राणेनगर बोगद्याजवळ शुक्रवारी मध्यरात्री दोन इसम दोन रेमडेसिविर इंजेक्शन काळ्या बाजारात ४८ हजार रुपयांना विकणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रात्री अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक सुरेश देशमुख यांना कळविली. पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करून इंजेक्शन देणाऱ्या इसमाला त्याच्या मोबाईलवर कॉल केला. कारमध्ये (एमएच ०४ ए वाय ३७५१) बसलेल्या व्यक्तींना पैसे देऊन त्याने संशयितांकडे इंजेक्शन मागितले. एका इंजेक्शनची किंमत ५ हजार ४०० रुपये असताना दोन इंजेक्शन काळ्या बाजारात तब्बल ४८ हजार रुपयांना विक्री केले जात होते. याचवेळी अंबड पोलिसांनी छापा टाकून संशयित अमोल रमेश देसाई (वय ३६, रा. विनयनगर) व निलेश सुरेश धामणे (४१, रा.कॉलेज रोड) यांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली होंडा सिटी कारसह इंजेक्शन व काही रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक सुरेश देशमुख यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात संशयित देसाई व धामणे यांच्याविरुद्ध अत्यावश्यक सेवा वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना शनिवारी न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या संशयितांनी इंजेक्शन कोठून आणले आणि यामध्ये अजून कोण संशयित सहभागी आहेत का, याचा शोध घेतला जात आहे. पोलीस उपनिरीक्षक राकेश शेवाळे अधिक तपास करीत आहेत.