नाशिक : जिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय शिक्क्यांसह अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांची प्रतिकृती तयार करून बेकायदेशीर रीत्या विविध प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याचा काळाबाजार उघडकीस आला असून विशेष म्हणजे या प्रकरणातील संशयित आरोपी मंगळे साळवे व त्याचा अज्ञात साथीदार रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात राहूनच हा सर्व प्रकार करीत असल्याचे समोर आले असून या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मंगळे साळवे सह त्याच्या अज्ञात साथिदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणीतील आरोपीने आपल्या ताब्यात एका बॅगमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक नाशिक यांचा गोल रबरी स्टॅम्प, एक आडवा रबरी स्टॅम्प, तसेच अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांचा एक आडवा रबरी स्टॅम्प या सोबत कोऱ्या वैदयकीय प्रमाणपत्रांचा गठ्ठा असल्याचा मिळून आला आहे. रबरी स्टॅम्पसह हे सर्व साहित्य आरोपीने बेकायदेशीररीच्या वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी आपल्या अज्ञात साथीदाराच्या मदतीने तयार करून आपल्या कब्जात बाळगले म्हणून रुग्णालय अधीक्षक नानासाहेब निकम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी (दि.१५) पोलिसांनी या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयाचा चा शिक्का रुग्णालया प्रशासनाबाहेरील व्यक्तीकडे आढळल्याने एकच खळबळ उडाली असून, या शिक्क्यांचा विविध कारणांसाठी गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनाबाहेरील व्यक्तीकडे आढळलेले शिक्के हे बनावट असून, त्याने बाजार पेठेतील शिक्के तयार करणाऱ्या कारागिराकडून तयार करून घेतल्याचा संशय जिल्हा प्रशानाने व्यक्त केला आहे.
नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात राहून सुरू होता बनावट प्रमाणपत्रांचा काळाबाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 4:22 PM
नाशिक जिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय शिक्क्यांसह अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांची प्रतिकृती तयार करून बेकायदेशीर रीत्या विविध प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याचा काळाबाजार उघडकीस आला असून विशेष म्हणजे या प्रकरणातील संशयित आरोपी मंगळे साळवे व त्याचा अज्ञात साथीदार रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात राहूनच हा सर्व प्रकार करीत असल्याचे समोर आले असून या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मंगळे साळवे सह त्याच्या अज्ञात साथिदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय प्रमाणपत्रांचा काळाबाजार संशयित आरोपीकडे आढळला बनावट शिक्के कोऱ्या प्रमाणपत्रांचा साठारुग्णालय अधीक्षकांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल