लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : मध्य रेल्वे विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे आरक्षणाच्या तिकिटांचा काळाबाजाराचा रोखण्यासाठी लॉकडाऊन आणि अनलॉक कालावधीत दलालांविरुद्ध मोहीम अधिक तीव्र केली. छाप्यांमध्ये सर्व मिळून ४४ दलालांना पकडण्यात आले आणि ८ लाख ६२ हजार १९१ किमतीची ४७९ ई-तिकिटे जप्त करण्यात आली.रेल्वेने दि. १ जूनला निवडक विशेष मेल, एक्स्प्रेस गाड्यांच्या १०० जोड्यांची घोषणा केली होती. अनेक वैयक्तिक आयडी वापरून ई-तिकिटे काढण्याची आणि या विशेष गाड्यांमध्ये आरक्षित जागा बळकावण्याच्या तक्र ारी प्राप्त होऊ लागल्या होत्या. दलालांविरुद्धच्या या मोहिमेत मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने सायबर सेल व इतर स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मध्य रेल्वेच्या सर्व विभागांवरील वेगवेगळ्या ठिकाणी, विशेषत: खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीच्या आवारात छापेमारी केली. आतापर्यंत या लॉकडाऊन व अनलॉकच्या कालावधीत मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने मुंबई विभागात २२ दलाल पकडले व त्यांच्याकडून ६ लाख ९ हजार २९८ किमतीची ३२८ लाइव्ह ई-तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्याविरुद्ध रेल्वे कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकरोडला रेल्वे तिकिटांचा काळाबाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 9:43 PM
नाशिकरोड : मध्य रेल्वे विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे आरक्षणाच्या तिकिटांचा काळाबाजाराचा रोखण्यासाठी लॉकडाऊन आणि अनलॉक कालावधीत दलालांविरुद्ध मोहीम अधिक तीव्र केली. छाप्यांमध्ये सर्व मिळून ४४ दलालांना पकडण्यात आले आणि ८ लाख ६२ हजार १९१ किमतीची ४७९ ई-तिकिटे जप्त करण्यात आली.
ठळक मुद्देई-तिकिटे जप्त : ४४ दलालांना पकडले