झाडे जगवा नाही, झाडे जगवूया !
पावसाळा सुरू झाला की, अनेक सामाजिक संस्था वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करतात. गावा-गावात झाडे लावा झाडे जगवा... अशा घोषणा दिल्या जातात. यावर गायकवाड यांनी सांगितले की, अशा घोषणा बदलून, आता झाडे लावूया झाडे जगवूया... अशा घोषणा देऊन त्या प्रत्यक्षात आचरणात आणण्याची गरज असून विदेशी झाडांपेक्षा करवंदासारखी देशी झाडे लावण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. त्यांनी वृक्षसंवर्धनासंदर्भात मार्गदर्शनही केले.
यावेळी आदिवासी साहित्यिक तुकाराम चौधरी, कृषी सहायक अशोक कर्डेल, राज्य कर उपायुक्त शरद सोनवणे, परिवहन अधिकारी विजय भोये, अप्पर पोलीस आयुक्त चंद्रकांत खांडवी, सह आयुक्त संतोष सूर्यवंशी, वित्त लेखाधिकारी जनार्दन खोटरे, जल परिषदेेचे प्रणेते राकेश दळवी, हेमंत महाले, वनाधिकारी नवनाथ गांगोडे, गीतेश्वर खोटरे, दुर्वादास गायकवाड, दत्तू साबळे, संजय गवळी, रमेश साबळे, सुरेश टोपले, वसंत राऊत, किरण नाठे, रोहित निकम, मनीषा घांगळे, खंडेराव डावरे, वृक्षवल्ली फाैंडेशनचे तुषार पिंगळे, सागर शेलार, भाऊसाहेब नेहरे, कमलाकर भुसारे, रवी पवार, शरद जोपळे यांच्यासह वृक्षप्रेमी उपस्थित होते.
फोटो - २५ पेठ २ करवंद
चांभारलेणी डोंगरावर करवंदाच्या रोपांच्या लागवडप्रसंगी वृक्षवल्ली फौंडेशन व जल परिषदेचे वृक्षप्रेमी नागरिक.
250721\25nsk_11_25072021_13.jpg
चांभारलेणी डोंगरावर करवंदाची रोपांच्या लागवडप्रसंगी वृक्षवल्ली फाऊंडेशन व जलपरिषदेचे वृक्षप्रेमी नागरिक.