शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
2
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
3
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
4
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
5
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
6
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
7
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
8
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
9
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
10
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
11
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
12
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
13
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
14
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
15
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
16
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
17
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
18
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान
19
‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय 
20
अफवेच्या तणावावर ‘थेरपी’ मुंबई विमानतळावर ‘पेट मी’ अनोखा उपक्रम 

काळ्या मातीत मातीत.. तिफन चालती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 9:53 PM

नांदूरवैद्य : पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात खरीप पीक लागवडीची लगबग सुरू झाली असून, शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीची अंतिम तयारी करीत आहेत. येथील कृषी विभागाच्या वतीने ३३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे.

नांदूरवैद्य : पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात खरीप पीक लागवडीची लगबग सुरू झाली असून, शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीची अंतिम तयारी करीत आहेत. येथील कृषी विभागाच्या वतीने ३३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. इगतपुरी तालुक्यात रोहिणी नक्षत्राने जोरदार सलामी दिल्यानंतर यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्याचा अंदाज शेतकऱ्यांना आला आहे. गेल्या आठवड्यात निसर्ग वादळाचा थोडाफार तडाखा बसला असला तरी तालुक्यात सुमारे ४९० मिमी पावसाची नोंद झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.इगतपुरी तालुका कृषी विभागाने तालुक्यातील घोटी आणि वैतरणा या तिन्ही मंडळ विभागात एकूण जवळपास सुमारे ३३ हजार ५०० हेक्टरवर यंदा खरिपाचे नियोजन केले आहे. यंदा प्रथमच इगतपुरी तालुक्यात मानवचलित भात लागवड यंत्राचा प्रयोग केला जाणार आहे. उत्पन्नवाढीसाठी शेतकºयांनी जमिनीचा पोत व पाण्याचा समतोल साधून योग्य पिकांची पेरणी करावी व चढ्या दराने बी-बियाणे, खते विक्र ी करणाºयांवर धडक कारवाईचा इशारा तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तंवर यांनी केले आहे.मका १९ आणि वरई १ हजार २९७ हेक्टरवर पेरली जाणार आहे, तर उर्वरित हेक्टर क्षेत्रावर तूर, मूग, भुईमूग, उडीद, खुरसणी, सोयाबीन, वाल आदी तृणधान्य, कडधान्य व अन्नधान्य, वेलवर्गीय पिकांची पेरणी केली. यासाठी लागणारे बियाणे, औषधे, खतांचा साठा विविध कृषी केंद्रात उपलब्ध झालेला असून, दोन आठवड्यांपासून अनेक शेतकºयांना त्यांच्या बांधावर, गावात, घरी जाऊन निविष्ठा उपलब्ध करून दिली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन या तेलवर्गीय पिकांच्या लागवडीसाठी शेतकºयांनी घरगुती पद्धतीचे बियाणे वापरावे यासाठी तालुक्यात जनजागृती केली जात आहे. कृषी विभागाच्या अंदाज पत्रकानुसार तालुक्यातील मुख्य भात पिकांचे क्षेत्र कमी करून, सोयाबीनला शेतकरी अधिक पसंती देतील, असे दिसून येत आहे.कांदा, सोयाबीन, मक्याला पसंतीयेवला : तालुक्यात खरीपपूर्व मशागतीत शेतकरी व्यस्त असून, यंदा तालुक्यातील पीक पॅटर्नमध्ये बदल होत असल्याचे दिसून येत आहे. कांदा, सोयाबीन, मका या पिकांकडे शेतकºयांचा कल वाढल्याने या पिकांचे तालुक्यातील क्षेत्र वाढणार असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, तर कपाशीचे क्षेत्र घटले आहे.तालुक्यात खरिपाचे सर्वसाधारण ५४ हजार २३३ हेक्टर क्षेत्र आहे. प्रत्यक्षात मात्र सुमारे ६० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात खरीप पेरणी होते. तालुक्यातील शेती पडणाºया पावसावर अवलंबून आहे. गेल्या काही वर्षात तालुक्यात कांदा लागवडीत वाढ झाली असून, त्यापाठोपाठ मका, सोयाबीन पीक घेण्यास शेतकरीवर्गाची पसंती आहे. पीक पॅटर्न बदलामुळे तालुक्यातील कपाशीचे क्षेत्र घटले असून, तूर, उडीद, भुईमूग क्षेत्रातदेखील यंदा वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.तालुका परिसरात उत्तर-पूर्व भागात निसर्ग वादळाने आलेल्या पावसाने शेतजमिनीत ओल झाली. या ओलीवर अनेकांनी खरीप हंगामातील मका, बाजरी, मूग आदींच्या पेरण्या केल्या, तर काही भागात अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने पेरणीसाठी शेतकºयांना प्रतीक्षा करावी लागत आहे. कृषी विभाग तालुक्यात गावोगावी शेतकरी मेळावे घेऊन जनजागृती करत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक