नाशिक : १५ नोव्हेंबरपासून सुरू होणाºया मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमासाठी घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्यासाठी केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नेमताना निवडणूक शाखेने शाळेच्या संपूर्ण शिक्षकांचीच या कामासाठी नेमणूक केल्यामुळे शाळेचे शैक्षणिक कामकाजच ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली असून, शुक्रवारी महाराष्टÑ नव निर्माण शिक्षक-शिक्षकेतर सेनेच्या शिक्षकांनी निवडणूक अधिकाºयांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.निवडणूक आयोगाने मतदार पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून, १५ ते ३० नोव्हेंबर यादरम्यान बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांची संपूर्ण माहिती गोळा करणार आहेत. त्यासाठी शासकीय कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, असे आदेशही आयोगाने प्रत्येक जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. बीएलओ नेमताना सर्व शासकीय कर्मचाºयांना मतदार यादीचे काम देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र शिक्षकांनाच या कामासाठी नेमण्यात आल्याचा आरोप शिक्षक संघटनेने केला आहे. नाशिक शहरात मतदार यादीचे काम करण्यासाठी सातपूर येथील जनता विद्यालय, महापालिकेच्या विद्या निकेतन शाळा क्रमांक ८ व महापालिकेची शाळा क्रमांक २२ या तीन शाळांमधील सर्वच शिक्षकांना बीएलओ म्हणून नेमणूक पत्र देण्यात आले आहे. निवडणूक शाखेच्या पत्रानुसार शिक्षकांना पंधरा दिवस सदरचे काम करावे लागणार आहे. शाळेच्या सर्व शिक्षकांनाच मतदार यादीचे काम देण्यात आल्याने शाळा बंद करण्याची वेळ आली असून, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कोण भरून देणार, असा सवाल शिक्षकांनी केला आहे. सध्या विद्यार्थ्यांनी सहामाही परीक्षा सुरू असून, या परीक्षेचे गुणपत्रिका तपासून निकालपत्रक तयार करण्याचे तसेच हा निकाल शासनास कळविण्याचे काम शिक्षकांना वेळेत पूर्ण करायचे आहे, ते कसे करणार अशी विचारणाही शिक्षकांनी केली आहे. या संदर्भात नवनिर्माण शिक्षक-शिक्षकेतर सेनेने उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रज्ञा बढे-मिसाळ यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी प्रकाश सोनवणे, ए. ई. पाटील, एल. आर. गारे, एस. आर. घुमरे, जी. जी. कोठावळे, पी. एच. सोनवणे, एम. एन. जाधव, एस. एन. हिंगे, एम. एन. गिते, के. डी. पवार आदी शिक्षक उपस्थित होते.
संपूर्ण शाळेच्या शिक्षकांना बीएलओचे कामनाराजी : मतदार यादीचे काम करण्यास शिक्षकांचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:30 AM
१५ नोव्हेंबरपासून सुरू होणाºया मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमासाठी घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्यासाठी केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नेमताना निवडणूक शाखेने शाळेच्या संपूर्ण शिक्षकांचीच या कामासाठी नेमणूक केल्यामुळे शाळेचे शैक्षणिक कामकाजच ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देनिवडणूक अधिकाºयांची भेट घेऊन तीव्र नाराजीशाळा बंद करण्याची वेळ शैक्षणिक नुकसान कोण भरून देणार