नाशिक : महापालिका सेवेत दाखल होताना मागासवर्गीय असलेल्या ११ कर्मचाºयांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ का करू नये, याबाबतची नोटीस प्रशासनाने बजावली आहे. येत्या दहा दिवसांत संबंधित कर्मचाºयांनी प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई अटळ आहे. महापालिका सेवेत दाखल झालेल्या अनुसूचित जाती, विशेष जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील कर्मचाºयांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. अथवा जात पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी जात पडताळणी समितीकडे दाखल केलेल्या अर्जाची पोहोच पावती सादर करणे अनिवार्य आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने महापालिकेकडे जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाºया कर्मचाºयांची माहिती मागविली होती.त्यानुसार प्रशासनाने आढावा घेतला असता, ११ कर्मचाºयांना वारंवार नोटिसा बजावूनही त्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केलेले नाही अथवा प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दाखल केलेल्या अर्जाची पोहोच पावतीही आढळून आलेली नसल्याचे निदर्शनास आले. त्यात अनुसूचित जाती प्रवर्गातील श्रीमती दुर्गा वामन निरे (शिपाई), सुमेश बिरदास दिवे (बिगारी), प्रवीण जगन्नाथ गांगुर्डे (बिगारी), अनिल कृष्णा पवार (बिगारी), मनोहर मोहन ढालवाले (बिगारी), राजू गंगाधर लोंढे (वॉर्डबॉय), रेवर देवजी धनाजी (स्वच्छता मुकादम), राजू नानासाहेब पगारे (वॉर्डबॉय), विशेष जाती अ प्रवर्गातील अनिल रामचंद्र सौदे (म.फी. वर्कर), भटक्या जमाती प्रवर्गातील पारूबाई अरुण धुमाळ (आया) आणि विशेष मागास प्रवर्गातील उमेश प्रभाकर नागपुरे (स्वच्छता मुकादम) या कर्मचाºयांचा समावेश आहे. यामधील दोन कर्मचारी १९८० ते ९० मध्ये, तर चार कर्मचारी १९९२ ते ९५ या काळात तसेच पाच कर्मचारी २००३ मध्ये महापालिका सेवेत दाखल झालेले आहेत. सदर कर्मचाºयांना दहा दिवसांची मुदत देण्यात आली असून, मुदतीत प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासन उपआयुक्त महेश बच्छाव यांनी सांगितले.अन्य कर्मचाºयांचीही तपासणीसद्यस्थितीत ११ कर्मचाºयांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. या कर्मचाºयांना यापूर्वी प्रशासनाकडून नोटिसाही बजावल्या होत्या. परंतु, कारवाई होत नव्हती. नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबत कारवाईचे निर्देश दिल्यानंतर प्रशासनाने संबंधितांना पुन्हा एकदा नोटिसा बजावून शेवटची संधी देऊ केली आहे. याशिवाय, अन्य विभागप्रमुखांनाही त्यांच्या कार्यालयातील कर्मचाºयांच्या सेवापुस्तिका तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे, या तपासणीतही आणखी काही कर्मचारी आढळून येण्याची शक्यता आहे.
अकरा कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 1:12 AM