नाशिक पश्चिम वनविभागाच्या चुंचाळे येथील डोंगराभोवती असलेल्या वन कक्ष क्रमांक २२७च्या राखीव वनात शुक्रवारी (दि.५) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास गवताने माेठ्या प्रमाणात पेट घेतला. हा भडका डोंगरमाथ्यावर उडाला, हे विशेष! आग लागल्याची माहिती मिळताच वनकर्मचाऱ्यांंसह अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन रात्रीच्या अंधारात शर्थीचे प्रयत्न करत ती विझविली आणि वनसंपदेवर आलेले संकट टळले. मात्र, यानंतर या आगीच्या घटनेसह यापूर्वी चामर लेणी, पाथर्डी येथील राखीव वन, पांडवलेणी डोंगराच्या सभोवताली असलेले राखीव वनातही लागलेल्या आगींची चौकशी वनविभागाकडून करण्यात आलेली नाही. राखीव वनांमध्ये आग लावणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध घेण्याची कुठलीही तसदी वनखात्याकडून घेतली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. राखीव वनांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असून, कृत्रिम वणवे रोखण्यासाठी वनविभागाला ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे निसर्गप्रेमींचे म्हणणे आहे.
राखीव वनांच्या सुरक्षिततेकरिता तारेचे कुंपण घालणे गरजेचे आहे. चामर लेणी, पांडवलेणी, अंजनेरीसह आदि राखीव वनांभोवती संरक्षक कुंपण घालून सातत्याने या भागांत गस्त वाढविणे गरजेचे आहे. यासोबतच राखीव वनांच्या संरक्षणाकरिता आजूबाजूच्या लोकवस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये जनजागृतीची बीजे पेरणेही काळाची गरज आहे, अन्यथा काही समाजकंटक प्रवृत्तींकडून अशाच प्रकारे जाणुनबुजून राखीव वनांमध्ये घुसखोरी करत आग लावण्याचे प्रकार घडत राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
-- इन्फो--
जाळरेषांचे चोख नियोजन हवे
राखीव वनांमधील वाळलेले गवत अचानकपणे पेटले, तरीही त्या आगीवर नियंत्रण नैसर्गिकरीत्या राहावे, याकरिता जाळरेषा आखण्याचे काम वनकर्मचाऱ्यांकडून हाती घेतले जाते. शहरासह जिल्ह्यातील काही वन परिक्षेत्रांमधील राखीव वनांभोवती जाळरेषा आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यास सुरुवातही झाली आहे. मात्र, काही वनक्षेत्रांत अद्यापही जाळरेषा काढण्याबाबतचे नियोजन होऊ शकलेले नाही. जाळरेषा काढून राखीव वने सुरक्षित करण्यावर वनविभागाला भर द्यावा लागणार आहे.
----इन्फो---
वनवणवा प्रतिबंध सप्ताहालाच गालबोट
चुंचाळे येथील राखीव वनात भडकलेल्या आगीमुळे वनवणवा प्रतिबंध जनजागृती सप्ताहालाच गालबोट लागल्याचे बोलले जात आहे. ७ फेब्रुवारीपर्यंत वनविभागाकडून विविध गावांमध्ये जंगलातील आगीच्या घटना टाळण्यासाठी, दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वनवणवा प्रतिबंध जनजागृती सप्ताह राबविला जातो. मात्र, नाशिक पश्चिम वनविभागाला या सप्ताहाचा विसरच पडला. वनवणवे टाळण्याकरिता आणि वन, वन्य जिवांच्या सुरक्षिततेकरिता अशा प्रकारचे जनप्रबोधनपर उपक्रम प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे.
--
फोटो आरवर ०६फायर/ ०६फायर१ नावाने.
===Photopath===
080221\08nsk_47_08022021_13.jpg
===Caption===
चुंचाळे येथील वणवा