नाशिक : दि ब्लार्इंड वेल्फेअर असोसिएशन या संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या अंध महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत गुजरातच्या संघाने विजेतेपद पटकाविले. तर मुंबईचा संघ उपविजेता ठरला.लीग पद्धतीने खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत गुजरातसह विदर्भ आणि मुंबईचे संघ सहभागी झाले होते. पहिला सामना विदर्भ विरूद्ध गुजरात यांच्यात झाला.गुजरातने १२ षटकात ८ बाद १४८ धावा फटकाविल्या होत्या. परंतु विदर्भ संघाला या धावसंख्येचा पाठलाग करता आला नाही. गुजरातने विदर्भाला अवघ्या ७० धावांमध्ये रोखले. या सामन्यात गुजरातच्या कनस्या कौशल हिने उत्कृष्ठ कामगिरी केली.दुसरा सामना मुंबई व गुजरात यांच्यात झाला. मुंबई संघाला अवघ्या ५० धावा करता आल्या. गुजरातने अवघ्या ४ षटकातच सामना खिशात घातला. या दोन्ही सामन्यात विजयी मिळविल्याने गुजरात संघाला स्पर्धेचा विजेता घोषित करण्यात आले. दुसऱ्या क्रमांकासाठी मुंबई आणि विदर्भ यांच्यात सामना झाला हा सामना मुंबई संघाने जिंकला. दुस ऱ्या क्रमांकासाठी झालेला सामनाच चुरशीचा ठरला. विदर्भाने सर्व गड्यांच्या मोबसल्यात अवघ्या ३६ धावा केल्या तर मुंबईने ८ गड्यांच्या मोबदल्यात ३७ धावा केल्या. अखेरच्या क्षणापर्यंत हा सामना चुरशीचा झाला.चौधरी यात्रा कंपनीचे अजित बने चौधरी यांच्या हस्ते विजेत्या संघास रोख रक्कम आणि चषक प्रदान करण्यात आला. चौधरी यात्रा कंपनीने प्रत्येक चौकारासाठी रोख रकमेचे बक्षिस जाहिर केले होते. त्यानुसार खेळाडूंना देखील बक्षीसांचे वाटप करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांनी प्रास्ताविक केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी मानद अध्यक्ष कल्पना पांडे, महासचिव दत्ता पाटील, भगवान पवार, तेजस्विनी शेवाळे यांनी प्रयत्न केले. याप्रसंगी अंध महिला मंगला धोंगडे यांना शिलाई मशीन तर प्रशांत जगताप यांना स्वयंरोजगारासाठी धनादेश देण्यात आला.
गुजरातच्या अंध महिला क्रिकेट संघाने पटकाविला चषक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 3:06 PM
दि ब्लार्इंड वेल्फेअर असोसिएशन या संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या अंध महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत गुजरातच्या संघाने विजेतेपद पटकाविले. तर मुंबईचा संघ उपविजेता ठरला. लीग पद्धतीने खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत गुजरातसह विदर्भ आणि मुंबईचे संघ सहभागी झाले होते.
ठळक मुद्देमुंबईचा संघ उपविजेता ठरला; दुस ऱ्या क्रमांकासाठी झालेला सामनाच चुरशीचा गुजरातच्या कनस्या कौशल हिने उत्कृष्ठ कामगिरी