हरसुले फाटा ते औंढेवाडी रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. त्याची तातडीने दुरुस्ती करावी या मागणीसाठी भाजपचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, भाऊसाहेब शिंदे, जयंत आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बुधवारी (दि. २२) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हरसुले फाट्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत आंदोलन केले. सुमारे अर्धा तास रास्ता रोको करण्यात आल्याने वाहतूक कोंडी झाली होती.
सिन्नर - घोटी रस्त्यावरील हरसुले फाटा ते औंढेवाडी हा रस्ता गेल्या एक वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक अपघात झाल्याने अनेकांचे प्राण गेले असून, काही जणांचा अपंगत्व आले आहे. या रस्त्यावरील तातडीने खड्डे बुजवावेत, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रवीण भोसले यांनी भाजपचे निवेदन स्वीकारले. यावेळी रामनाथ डावरे, सुभाष कर्पे, शांताराम आव्हाड, संजय पवार, बहिरू दळवी, चंद्रकांत भागवत, विशाल क्षत्रिय, सजन सांगळे, सचिन गोळेसर, मुकुंद खर्जे, दर्शन भालेराव, राहुल इनामदार, जिल्हा चिटणीस सविता कोठूरकर, मंगला झगडे, चंद्रकला सोनवणे, सुनीता काळोखे, रूपाली काळे, ललिता पवार, सोनांबेचे सरपंच डॉ. पवार, अनिल पवार, मनोज शिरसाट, रवि साबळे, सुरेश जोंधळे, शरद जाधव, संजय सांगळे, किरण वाघ, गणेश क्षीरसागर, सुभाष जोर्वे, संजय पवार, सुरेश वरंदळ, मनीषा लोंढे, छाया जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
इन्फो
रस्ता दुरुस्तीचे आश्वासन
या रस्त्याचे टेंडर निघाले असून, वर्कऑर्डर काढणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिले. उपअभियंता भोसले यांच्या लेखी आश्वासनानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको मागे घेतला. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
फोटो - २२सिन्नर रास्ता रोको
रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलनप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, भाऊसाहेब शिंदे, जयंत आव्हाड, रामनाथ डावरे, सुभाष कर्पे, सविता कोठूरकर, रूपाली काळे, मंगला झगडे, चंद्रकला सोनवणे, सुनीता काळोखे, शांताराम आव्हाड, संजय पवार, बहिरू दळवी, चंद्रकांत भागवत यांच्यासह कार्यकर्ते.
220921\22nsk_18_22092021_13.jpg
फोटो - २२सिन्नर रास्तारोको