देवळा : शेतीकामाच्या दृष्टीने दिवसा वीजपुरवठा होणे महत्त्वाचे असताना महावितरणने अन्यायकारक भारनियमन लादले आहे. ते रद्द करत कृषिपंपांना दिवसा वीज मिळेल, असे नवीन सुधारित वेळापत्रक करावे या मागणीसाठी भाजपच्या वतीने शुक्रवारी (दि.४) येथील पाच कंदीलजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आमदार डॉ.रा हुल आहेर, भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
येथील भागात सध्या कांदालागवड जोरात सुरू आहे. परंतु महावितरण कंपनीने १ डिसेंबरपासून नवीन वेळापत्रक केल्याने शेतीच्या दृष्टीने ते चुकीचे आहे. या पार्श्वभूमीवर दिवसा वीजपुरवठा व्हावा, असे नियोजन तातडीने व्हावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या फसव्या घोषणांचा निषेध करण्यात आला.
तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ, कार्यकारी अभियंता एस.पी. भोये, पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांना सदर मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष दादा जाधव, पुंडलिक आहेर, भाऊसाहेब पगार, अशोक आहेर, दिलीप पाटील, दयाराम सावंत, शहराध्यक्ष अतुल पवार, कौतिक पवार, संभाजी आहेर, दिनकर आहेर, किशोर आहेर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन दराडे, तालुकाध्यक्ष दिशांत देवरे, नदिश थोरात, संजय मोरे, प्रवीण मेधणे, दयाराम सावंत, विलास निकम, भास्कर पवार, शशिकांत निकम, प्रदीप आहेर, मुन्ना अहिरराव, नानू आहेर, समाधान आहेर, अंबादास मांडवडे, दिलीप शिवले, शंकर निकम, विकास ठाकरे, दिलीप जोंधळे, दयाराम पगार, विजय सूर्यवंशी, मनेश ब्राम्हणकर, विलास देवरे, सुनील सावंत, अतुल देवरे, जिजाऊ निकम, शेरान शेख, गोपी मणियार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलनावेळी रुग्णवाहिका आल्याने तातडीने रस्ता खुला करून देण्यात आला.
इन्फो
सरकारविरोधी घोषणाबाजी
आमदार डॉ.राहुल आहेर, भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, सुनील देवरे, अण्णा शेवाळे, केदा शिरसाठ, दादाजी बोरसे यांनी आपल्या मनोगतातून सरकारच्या धोरणांवर आगपाखड केली. ‘हक्काची वीज दिवसा मिळालीच पाहिजे’, ‘वीजबिल माफी झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत आणि वायर व शॉक बल्ब दाखवत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
फोटो :
०४देवळा बीजेपी
शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा व्हावा या मागणीसाठी शहादा-प्रकाशा राज्यमार्गावर येथील पाच कंदीलजवळ भाजपच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करताना आमदार डॉ. राहुल आहेर, जिल्हाध्यक्ष केदा आहेर आदी.
===Photopath===
041220\04nsk_33_04122020_13.jpg
===Caption===
शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा व्हावा या मागणीसाठी येथील पाच कंदिलजवळ शहादा प्रकाशा राज्यमार्गावर भाजप च्या वतीने रास्तारोको आंदोलन करतांना आमदार डॉ. राहुल आहेर, जिल्हाध्यक्ष केदा आहेर व इतर.