मडकीजाम येथील निवृत्ती भास्कर बोराडे या शेतकऱ्याने वीजबिल भरल्यावर वीज जोडून द्या यासाठी वीज मंडळाचे कनिष्ठ अभियंता बोरकर यांना फोन केला होता. सदर अभियंत्याने शेतकऱ्यास अर्वाच्य शिवीगाळ व मारहाणीची धमकी दिल्याची रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. यानंतर रविवारी याचे शेतकऱ्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले. संतप्त शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे जमा होत दिंडोरी- पालखेड चौफुलीवर रास्ता रोको केला. सदर अधिकाऱ्याचे त्वरित निलंबन करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. यावेळी शिवसेना नेते प्रवीण जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, भाजप तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे, जिल्हा उपप्रमुख कैलास पाटील, संतोष मुरकुटे, बाजार समिती उपसभापती अनिल देशमुख, काँग्रेस नेते प्रीतम देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, राजेंद्र उफडे, गंगाधर निखाडे, डॉ. योगेश गोसावी, सचिन देशमुख, श्याम हिरे, नगरसेवक प्रमोद देशमुख, राकेश शिंदे, प्रमोद मुळाणे, तुकाराम जोंधळे, निलेश शिंदे, लखन पिंगळ, गोटीराम जगताप, विनायक शिंदे, नितीन आव्हाड, प्रभाकर वडजे, प्रकाश आहेर, विजय वडजे आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा दबाव
शेतकऱ्यास शिवीगाळ व मारहाणीच्या धमकीचा प्रकार घडला असताना वीज मंडळाच्या सदर अधिकाऱ्याने शेतकऱ्यांविरोधात दिंडोरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी शेतकऱ्यांवर सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करावा व तत्काळ अटक करावी, असा दबाव दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्यावर आणला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच त्यांनी गुन्हा दाखल केला नाही म्हणून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचीही चर्चा आहे. पोलीस अधिकाऱ्यांवर कुणाचा दबाव होता या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना नेते प्रवीण जाधव यांनी केली.
===Photopath===
280321\28nsk_1_28032021_13.jpg
===Caption===
दिंडोरी-पालखेड चौफुलीवर करण्यात आलेली्या रास्तारोकाप्रसंगी मार्गदर्शन करताना शिवसेनेचे प्रवीण जाधव.