आंदोलनात परेश परदेशी, रमेश मोहन, बबन मांजरे, राजू भागवत, गोरख शिंदे, बापू गवळी, देवा गवळी, अमजद पठाण, अनू भावसार, संदीप शिनगर, नवनाथ सांबरे, पांडू दराडे, संतोष पाबळे, दीपक पैठणकर, संजय जेजूरकर, असलम शहा, ज्ञानेश्वर सैद आदींसह चालक, मालक सहभागी झाले होते.
----------------------
या आहेत मागण्या...
केंद्र सरकारने दीड वर्षापासून वाहनधारकांना कागदपत्राची माफी दिलेली असताना देखील आरटीओ हे रोडवर बेकायदेशीर दंड वसूल करतात व विनाकारण त्रास देतात, हे थांबवा. एसटी महामंडळ बेकायदेशीर मालवाहतूक करीत असूनदेखील त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे कार्यवाही होत नाही. स्थानिक पोलीस सोडून बाहेरील पोलिसांचा अतोनात त्रास होतो, हे थांबवा. डिझेल व पेट्रोलच्या किमतीत होणारी भरमसाठ दरवाढ थांबवावी व दर कमी करावेत, पासिंगसाठी जुने दर ठेवण्यात यावे, टोल नाक्यावरील वाढलेले दर कमी करण्यात यावे, आदी मागण्या सदर निवदेनात करण्यात आल्या आहेत.
------------------------------
येवला येथे मालवाहतूक करणाऱ्या चालक, मालकांनी विविध मागण्यांसाठी केलेल्या रास्ता रोकोप्रसंगी बोलताना सुधाकर पाटोळे. (०५ येवला रास्ता रोको)
050721\05nsk_37_05072021_13.jpg
०५ येवला रास्ता रोको