येवला : ओबीसी आरक्षण प्रश्नी अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने येथील विंचूर चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.गुरूवारी समता परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते शहरातील विंचूर चौफुलीवर जमा झाले. त्यांनी नाशिक, पुणे व औरंगाबाद महामार्ग रोखला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ, समता परिषदेचे तालुका अध्यक्ष मोहन शेलार, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, जिल्हा परिषद सदस्य महेंद्रकुमार काले, विनायक घोरपडे, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख किशोर सोनवणे, ज्ञानेश्वर दराडे आदींनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनकर्त्यांच्या वतीने शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य अरूण थोरात, वसंत पवार, जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, ज्ञानेश्वर शेवाळे, किसनराव धनगे, दीपक लोणारी, प्रवीण बनकर, मुश्ताक शेख, मलिक शेख, संतोष परदेशी, अमजद शेख, गणेश गायकवाड, निसार शेख, निसार निंबुवाले, राजश्री पहिलवान, सचिन कळमकर, मकरंद सोनवणे, सुनील पैठणकर सहभागी झाले होते.
येवल्यात ओबीसी आरक्षण प्रश्नी समता परिषदेचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 5:06 PM