कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्यविषयक साधनसामग्रीचा तुटवडा होत असून, रक्ताचासुद्धा तुटवडा होऊ नये व १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार असून, तरुणांनी त्या अगोदर रक्तदान करावे ह्या अनुषंगाने आज १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून युवा मोर्चातर्फे छत्रपती शिवाजी महाराजनगर, गांगुर्डे मळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, जिल्हा संघटन सरचिटणीस देवा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराला सुरुवात करण्यात आली. शिबिराचे आयोजन युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्याम गांगुर्डे, जिल्हा सरचिटणीस सुनील शेलार यांनी केले होते. रक्तदात्यास एक प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले.
यावेळी राहुल पाटील, राजू सूर्यवंशी, दिनेश शेवाळे, धनंजय पवार, रवींद्र जाधव, बाबू गुप्ता, पप्पू पाटील, ओमकार बच्छाव, भूषण शिंदे, दीपक जगताप, आप्पा कुलथे, ॠषिकेश निकम, जय सरनाईक, जयेश देवरे, राहुल आघारकर आदी उपस्थित होते.