राज्यात केारोनामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने ‘लोकमत’तर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘रक्ताचं नातं’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विविध संस्था, संघटनांना ‘लोकमत’च्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करता येऊ शकते. शिबिर आयोजित करण्यास पुढाकार घेणाऱ्यांना ब्लड बँकेसह सर्व तांत्रिक बाबी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
प्रायोजक दीपक बिल्डर्स व डेव्हलपर्स तसेच थिंक फाउंडेशन, विक्रम टी, योनो एसबीआय, सार्वजिनक आरोग्य विभाग व राज्य रक्तसंक्रमण परिषदेतर्फे (एसबीटीसी) यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित केले जात आहे. रक्ताला जात, धर्म, पंथ नसतो. रक्तदानाने माणुसकीचे नाते तयार होते. त्यामुळे रक्तदानाच्या या महायज्ञात आपण सहभागी व्हावे, असे आवाहन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले आहे.
‘लोकमत’च्या रक्तदान महायज्ञात सहभागी होणाऱ्या संस्था किंवा संघटनांनी येत्या ३० जूनपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. नाशिकमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी ८५३०६१९९९४ या क्रमांकावर संपर्क साधावा.
चौकट-
दि.१ ते ४ जुलैदरम्यान या ठिकाणी होणार शिबिर
१ जुलै - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, ज्ञानगंगोत्री, गंगापुर धरणाजवळ, गोवर्धन, नाशिक, वेळ स. ९ ते दु. २ वाजेपर्यंत
इंडियन मेडीकल असोशिएशनतर्फे आयएमए हॉल, शालिमार . संपर्क - ९८९०९८८९७० . वेळ , स. ९ ते दु. १
२ जुलै - अरिहंत नर्सिंग होम, निर्मला कॉन्व्हेंट शाळेजवळ , सावरकर नगर , गंगापूर रोड, संपर्क- ८४८२८८०९१६ , वेळ,स. १० ते दु. २
स्टार प्लस कमर्शियल कॉम्प्लेक्स , मुक्तीधाम मंदिरासमोर, दुर्गा गार्डन जवळ, संपर्क - ८९७५४०३४६९, वेळ-स. १० ते २
इंडियन डेंटिस्ट असोशिएशन, कालिका कमर्शियल कॉम्प्लेक्स, कालिका मंदिरा समोर , मुंबई नाका,नाशिक, संपर्क - ८९८३३३३२८५ , वेळ - स. १० ते २
सीए इंन्स्टिट्युट , संपर्क - ९४२१९५७१०७, जनकल्याण ब्लड बँक, श्रीनगर, गंगापूर रोड वेळ सकाळी १० ते दुपारी ३
नगरसेवक विलास शिंदे यांच्या सहकार्याने , संपर्क- ९९२३१२५३८८ , क्रांती चौक, भाजी मार्केट, गंगापूर गाव वेळ -स.९ ते २
३ जुलै - सह्याद्री हॉस्पिटल, (दिव्या फाउंडेशन) संपर्क - ९६७३८५२८६४ , मुंबई-आग्रा रोड,वडाळा रोड, द्वारका चौक, भाभा नगर, वेळ : स.१० ते ४
४ जुलै- सह्याद्री हॉस्पिटल (दिव्या फाउंडेशन), संपर्क - ९६७३८५२८६४, मुंबई-आग्रा रोड,वडाळा रोड, व्दारका चौक, भाभा नगर, वेळ-स.१० ते ४मुंबई-आग्रा रोड,वडाळा रोड, व्दारका चौक, भाभा नगर, वेळ-स.१० ते ४
(सूचना: ‘रक्ताचं नातं’ लोगो वापरावा)