इगतपुरी: शहरातील बाल शिवाजी मित्र मंडळाने गणेशोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
गणपती उत्सव म्हणलं तर या काळात अनेक वेगवेगळे कार्यक्रम होत असतात; मात्र कोरोना काळ असल्याने येथील बाल शिवाजी मित्र मंडळाने रक्तदान शिबिराच्या माध्यमातून एक आगळा वेगळा उपक्रम राबवून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात रक्त टंचाई जाणवू नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना वायफळ खर्च टाळून आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत इगतपुरी येथील बाल शिवाजी मित्र मंडळाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळपास ५१ वृद्ध, तरुणांसह, महिलांनीही सहभाग घेतला.
शिबिर यशस्वीतेसाठी विशाल गायकवाड, बंटी सद्गुर, योगेंद्र शर्मा, प्रवीण कदम, कमल शर्मा, अंकुर सदगुरू, विकी थोरात, हृषिकेश जाधव व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
130921\1552-img-20210913-wa0018.jpg
फोटो -
इगतपुरी शहरातील बाळ शिवाजी मित्र गणेशोत्सवानिमित्त रक्तदान राबल्या प्रसंगी प्रमाण पत्र स्वीकारताना मंडळाचे पदाधिकारी