नाशिक : ‘लोकमत रक्ताचं नातं’ उपक्रमाच्या तिसऱ्य. दिवशीदेखील शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सलग तिसऱ्य. दिवशी रक्तदानाची शतकी हॅट्ट्रिक पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यात रविवारी (दि. ४) एकूण १४१ पिशव्या रक्तसंकलन झाले असल्याने आतापर्यंतच्या गत तीन दिवसांत ४४२ रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या आहेत.
लोकमततर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी आणि ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभिनव उपक्रमाला सलग तिसऱ्या दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रविवारी दिव्य फाउंडेशनच्या वतीने जनकल्याण ब्लड बँकेच्या माध्यमातून सह्याद्री हॉस्पिटलमध्ये झालेल्या शिबिरात एकूण २५ पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले. दोन दिवसांच्या या रक्तसंकलनात सुयोग कुलकर्णी, अनिमेश दुबे, रोहन परदेशी, श्याम मानकर, विनय निमकर, जगदीश साळवे, चंद्रशेखर बोराडे यांनी विशेष परिश्रम घेतले. तर जिल्हा रुग्णालयाच्या मेट्रो ब्लड बँकेच्या माध्यमातून कालिका मॉलमध्ये झालेल्या शिबिरात एकूण १६ पिशव्या रक्तसंकलित करण्यात आले. डॉ. श्वेता कापडणीस, डॉ. महेश देवरे, डॉ. प्रशांत चौधरी, यांच्यासह डेंटल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केले.
---इन्फो---
बालगणेश फाउंडेशनचे अर्धशतक
शहरातील पंडित कॉलनीमधील बालगणेश फाउंडेशनच्या वतीने समता ब्लड बँकेच्या माध्यमातून आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभल्याने ५० पिशव्या रक्तसंकलन झाले. त्यात विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल खैरनार, अनंत फरताळे, रोशन शिंदे, आदित्य बोरस्ते आणि गणेश शेजवळ यांनी मोलाचे योगदान दिले. यावेळी बोरस्ते यांच्या हस्ते सर्व रक्तदात्यांना तुळशीची रोपे देऊन सन्मानित करण्यात आले, तर शालिमारवरील शिवसेना कार्यालयात नाशिक ब्लड बँकेच्या माध्यमातून २० बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले. त्यासाठी नगरसेवक सुनील गाेडसे, राजू वाकसरे, गणेश बर्वे, योगेश बेलदार, तेजस विसपुते, राहुल परदेशी सिद्धांत काठे यांनी विशेष परिश्रम घेतले.
इन्फो
कोटमगावला २७ जणांचे रक्तदान
एकलहरेनजीक कोटमगावला २७ रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या. कोटमगावला सरपंच बाळासाहेब म्हस्के व सदस्य चंद्रभान म्हस्के यांनी प्रथम रक्तदान करुन शिबिराचे उदघाटन केले. नवजीवन ब्लड बँकेच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या शिबिरानंतर सर्व रक्तदात्यांना सहभागाबद्दल लोकमततर्फे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
इन्फो
वडिलांचा रक्तदानाचा वारसा मुलाकडे
बालगणेश उद्यानात आयोजित शिबिरात खासगी कंपनीतील अधिकारी प्रशांत गाडगीळ यांनी १०३ व्यांदा रक्तदान केले. १९८० सालापासून ते सातत्याने रक्तदान करीत आहेत. त्यांच्यासमवेतच त्यांचा चिरंजीव अथर्व गाडगीळ यांनी पहिल्यांदा रक्तदान केले. वडिलांकडून रक्तदानाची प्रेरणा घेऊन वडिलांपेक्षाही अधिक वेळा रक्तदान करण्याचा संकल्प व्यक्त करीत त्यांनी खऱ्या अर्थाने रक्तदानाचा वारसा स्वीकारला, तर याच केंद्रावर गणेश शेजवळ आणि दीपाली शेजवळ या दाम्पत्यानेदेखील बरोबर रक्तदान करून समाजापुढे आदर्श घालून दिला.
इन्फो
साेमवारी एक, तर मंगळवारी दोन ठिकाणी रक्तदान
‘लोकमत रक्ताचं नातं’ अभियानात सोमवारी केवळ एकलहरेतील सिद्धार्थनगर येथे सकाळी ९ पासून रक्तदान शिबिर होणार आहे, तर मंगळवारी मुंबई नाक्यावर बिझनेस बे तसेच आडगावचे पोलीस मुख्यालयात पोलीस पब्लिक स्कूल येथे अशा दोन ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
फोटो
०४गाडगीळ
रक्तदान केल्यानंतर प्रमाणपत्रासह पितापुत्र प्रशांत गाडगीळ आणि अथर्व गाडगीळ.
----------
०४शेजवळ
गणेश शेजवळ आणि दीपाली शेजवळ या दाम्पत्याने रक्तदान केल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र प्रदान करताना अजय बोरस्ते.
---------------
०४ सह्याद्री
सह्याद्री हॉस्पिटलमधील रक्तदान शिबिरात रक्तदान करताना रक्तदाता.
--------------
०४कोटमगाव
कोटमगावला केलेल्या रक्तदानानंतर प्रमाणपत्रासह सरपंच बाळासाहेब म्हस्के, सदस्य चंद्रभान म्हस्के आणि अन्य ग्रामस्थ.
---------
०४पीएचजेएल ७१
शिवसेना कार्यालयात झालेल्या रक्तदानानंतर प्रमाणपत्रासह रक्तदाता.
--------------